Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vi आणणार सर्वात मोठा FPO, २०००० कोटी उभारण्याचा प्लॅन; कुठे होणार पैशांचा वापर?

Vi आणणार सर्वात मोठा FPO, २०००० कोटी उभारण्याचा प्लॅन; कुठे होणार पैशांचा वापर?

एकेकाळी व्होडाफोन आणि आयडिया या दोन स्वतंत्र टेलिकॉम कंपन्या होत्या. मात्र, जिओच्या एन्ट्रीनंतर दोघांनाही एकत्र यावं लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 02:16 PM2024-04-11T14:16:25+5:302024-04-11T14:17:16+5:30

एकेकाळी व्होडाफोन आणि आयडिया या दोन स्वतंत्र टेलिकॉम कंपन्या होत्या. मात्र, जिओच्या एन्ट्रीनंतर दोघांनाही एकत्र यावं लागलं.

Vodafone idea to Bring Largest FPO Plan to Raise 20000 Cr Where will the money be used know details | Vi आणणार सर्वात मोठा FPO, २०००० कोटी उभारण्याचा प्लॅन; कुठे होणार पैशांचा वापर?

Vi आणणार सर्वात मोठा FPO, २०००० कोटी उभारण्याचा प्लॅन; कुठे होणार पैशांचा वापर?

एकेकाळी व्होडाफोन आणि आयडिया या दोन स्वतंत्र टेलिकॉम कंपन्या होत्या. मात्र, जिओच्या एन्ट्रीनंतर दोघांनाही एकत्र यावं लागलं. गेल्या काही वर्षांमध्ये, व्होडाफोन आयडियानं सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक म्हणून आपली जुनी ओळख गमावली आहे. आता ती रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, कंपनी लवकरच FPO (फॉलो-अप पब्लिक ऑफर) लाँच करणार आहे असल्याची माहिती आता समोर येत आहे. याद्वारे 18,000-20,000 कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे.
 

याआधी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अधिकृत भागभांडवल 1 लाख केटी रुपये करुन आदित्य बिर्ला समूहानं 2075 कोटी रुपये जमवण्याला मंजुरी दिल्याची माहिती यापूर्वी शनिवारी जाहीर करण्यात आलं होतं. यासाठी कंपनी 8 मे रोजी भागधारकांची मंजुरी घेणार आहे. ऑफरमध्ये प्रति शेअर ₹14.87 दरानं 1,395,427,034 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
 

व्होडाफोन आयडिया एफपीओ
 

तज्ज्ञांच्या मते, हा एफपीओ Vi साठी लाइफलाइन ठरू शकतो. आत्तापर्यंत, येस बँकेचा 15,000 कोटी रुपयांचा सर्वात मोठा इश्यू होता. परंतु, Vodafone Idea FPO भारतातील सर्वात मोठा एफपीओ बनून त्याची जागा घेईल. व्होडाफोन आयडियानं परदेशी आणि देशांतर्गत संस्थांसह अँकर गुंतवणूकदारांकडून कमिटमेंट्स मिळवल्याचं वृत्त आहे.
 

मार्ग सुकर होण्याची शक्यता
 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारत सरकारने शेअर विक्रीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. वाईट काळातही व्होडाफोन आयडियामध्ये सरकारचा 33% इतका मोठा हिस्सा आहे. हा एफपीओ संकटाचा सामना करणाऱ्या कंपनीला आवश्यक लिक्विडीटी प्रदान करेल. व्होडाफोन आयडियाकडे फेब्रुवारीमध्येही 220.5 मिलियन इतकी मोठी ग्राहकसंख्या आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याचा ग्राहकसंख्या कमी होत आहे.

Web Title: Vodafone idea to Bring Largest FPO Plan to Raise 20000 Cr Where will the money be used know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.