Join us

व्होडाफोन, आयडियाला विशेष वागणूक मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 12:26 AM

विलीनीकरण होत असलेल्या व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांना कोणतीही विशेष

नवी दिल्ली : विलीनीकरण होत असलेल्या व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांना कोणतीही विशेष वागणूक मिळणार नाही. त्यांना स्पेक्ट्रम, ग्राहक आणि महसुलाची कमाल मर्यादा यासंबंधीच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे प्रतिपादन दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलेसिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणालाही विशेष वागणूक मिळणार नाही. त्यांना नियमांचे पालन करावेच लागेल. विलीनीकरणामुळे एकाधिकारशाही येण्याचा कोणताही धोका नाही. प्रत्येक सेवा क्षेत्रात ५ ते ६ कंपन्या राहणारच आहेत. कोणाचीही एकाधिकारशाही निर्माण होणे शक्य नाही. याशिवाय महसूल, ग्राहक आणि स्पेक्ट्रम यांना कायद्यानुसार कमाल मर्यादा आहे. ती कोणालाही ओलांडता येणार नाही.