ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29- दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्स अॅपला सर्व ग्राहकांची माहिती तसेच त्यांचा डेटा लगेचच काढून टाकण्यात यावा. असा आदेश दिला होता. मात्र, व्हॉट्स अॅपने उच्च न्यायालयाचा आदेश मानायला नकार दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आमच्या पॉलिसीमध्ये कोणताच फरक पडणार नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे युजर्सची माहिती फेसबुकसोबत शेअर करणारच असं व्हॉट्स अॅपचे प्रवक्ते ऐन येह यांनी 'मेशेबल इंडिया'शी बोलताना सांगितलं .
काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आणि युजर्सची माहिती फेसबुकसोबत शेअर करायला सुरूवात केली आहे.