- प्रसाद गो. जोशी
सरकारकडून उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्याला होत असलेला विलंब, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला धक्का, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती, वित्तसंस्थांकडून सुरू असलेली विक्री, कोरोनाचे वाढते रुग्ण अशा विविध कारणांमुळे बाजारातील वातावरण अस्थिर राहिले. त्यामुळे बाजारात झालेली अल्प स्वल्प वाढही अस्वलाने नेली. आगामी सप्ताहात होणाऱ्या विविध घोषणांकडे आता बाजाराची नजर लागली असून त्यावरच पुढील सप्ताहात वाटचाल होईल.
कोरोनाचे वाढते रुग्ण, अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार युद्धाची भीती आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जाहीर होणारे नकारात्मक अंदाज यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. अर्थव्यवस्थेबाबतची विविध आकडेवारी येत्या सप्ताहात जाहीर होईल. त्यावर बाजाराची दिशा ठरेल.
गतसप्ताहामध्ये बाजार खाली आल्याचा फायदा विविध वित्तीय संस्थांनी घेतला आहे. परकीय वित्तसंस्थांनी १८,५८९.६८ कोटी रुपयांची तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ९१७.९२ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. त्यामुळे बाजारातील घसरण काहीशी कमी झाली.
शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता केवळ निफ्टी फार्मा हा एकच निर्देशांक वाढला. निफ्टी बॅँक (१० टक्के), निफ्टी मेटल (९.८ टक्के) तर निफ्टी रिअल्टी (९.५ टक्के ) खाली आले. च्आगामी सप्ताहात औद्योगिक उत्पादन, चलनवाढ व अर्थव्यवस्थेविषयीची अन्य आकडेवारी जाहीर होणार आहे.
अस्थिर बाजार धास्तीमध्येच; नजर भविष्याकडे
उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्याला होत असलेला विलंब, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला धक्का, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती, वित्तसंस्थांकडून सुरू असलेली विक्री, कोरोनाचे वाढते रुग्ण अशा विविध कारणांमुळे बाजारातील वातावरण अस्थिर राहिले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:04 AM2020-05-11T00:04:08+5:302020-05-11T00:05:21+5:30