Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोक्सवॅगनची चौकशी जर्मनीत सरकारकडून सुरू

फोक्सवॅगनची चौकशी जर्मनीत सरकारकडून सुरू

डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती दडविणारे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीची चौकशी जर्मनीच्या सरकारने सुरू केली आहे

By admin | Published: September 23, 2015 10:09 PM2015-09-23T22:09:02+5:302015-09-23T22:09:02+5:30

डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती दडविणारे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीची चौकशी जर्मनीच्या सरकारने सुरू केली आहे

Volkswagen investigations begin with government in Germany | फोक्सवॅगनची चौकशी जर्मनीत सरकारकडून सुरू

फोक्सवॅगनची चौकशी जर्मनीत सरकारकडून सुरू

बर्लिन : डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती दडविणारे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीची चौकशी जर्मनीच्या सरकारने सुरू केली आहे. जर्मनीत फोक्सवॅगन ही कंपनी सगळ्यात मोठी आहे.
कंपनीवर जे आरोप आहेत त्यांच्या चौकशीसाठी सरकारने आयोगाची स्थापना केली आहे. जर्मनीचे वाहतूक मंत्रालय व चौकशी आयोग अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करतील. सरकारने या चौकशीचे आदेश दिल्यामुळे ‘मेड इन जर्मनी’ मोहिमेचे नुकसान होऊ शकते, अशी शंका व्यक्त होत आहे.
फोक्सवॅगन कंपनीने आमच्या १.१ कोटी डिझेल कारमध्ये प्रदूषणाचे खरेखुरे मोजमाप न होऊ देणारे उपकरण लावण्यात आल्याचे कबूल केले आहे. अमेरिका आणि कॅनडाने फोक्सवॅगनची चौकशी सुरू केली आहे.
फ्रँकफर्ट स्टॉक एक्स्चेंजमध्ये फोक्सवॅगनच्या शेअरची किमत मंगळवारी २० टक्के खाली आली तर सोमवारी ती १६ टक्क्यांनी घसरली होती. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीने फोक्सवॅगनची ही लबाडी उघडकीस आणली होती.

सरकारचे
लक्ष-गडकरी
नवी दिल्ली : फोक्सवॅगन कंपनीने प्रदूषण लपविण्यासाठी केलेल्या लबाडीवर सरकारची नजर आहे. तथापि, त्याची काळजी करावी, असे काही नाही, असे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
गरज पडल्यास त्या प्रकरणी योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. ते बुधवारी येथे वार्ताहरांशी बोलत होते. हे प्रकरण अमेरिकेतील असून आम्हाला त्या संदर्भातील अहवालाची प्रतीक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Volkswagen investigations begin with government in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.