नवी दिल्ली : आता कोणत्याही व्यक्तीला पॅनकार्ड मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड पुरेसे असेल. आयकर विभागाने पॅनकार्ड मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅनकार्डसाठी मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता देणारी अधिसूचना अलीकडेच जारी केली आहे.
संबंधित व्यक्तीची ओळख व रहिवासी पत्ता यासाठी मतदान ओळखपत्र, आधार कार्डला आतापर्यंत पुरावा मानले जात होते. मात्र, जन्मतारखेसाठी हे दोन्ही दस्तावेज ग्राह्य धरले जात नव्हते.
आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पॅनकार्ड मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड हा पुरेसा पुरावा आहे, असा या नव्या अधिसूचनेचा अर्थ आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी विविध दस्तावेज सादर करण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया सुलभ झाली आहे. नव्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेच्या साक्षांकनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, राज्य सार्वजनिक उपक्रम किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेच्या छायाचित्र ओळखपत्राला पुरावा मानण्यात येणार आहे.
जन्मतारखेच्या शहानिशेसाठी आता १२ दस्तावेज सादर करता येऊ शकतात. पूर्वी आठच दस्तावेज ग्राह्य धरले जात होते. सरकारी कर्मचारी नसलेल्या सामान्य नागरिकांसाठी केवळ मतदान ओळखपत्र
किंवा आधार कार्डची आवश्यकता असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पॅनकार्ड मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड पुरेसे
आता कोणत्याही व्यक्तीला पॅनकार्ड मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड पुरेसे असेल. आयकर विभागाने पॅनकार्ड मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
By admin | Published: April 20, 2015 11:39 PM2015-04-20T23:39:55+5:302015-04-20T23:39:55+5:30