नवी दिल्ली : ठरल्याप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल व एमटीएनएल या सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याद्वारे ८0 हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे.
ही योजना ४ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, ३ डिसेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येतील. बीएसएनएलच्या दीड लाख कर्मचाºयांपैकी १ लाख कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्ती घेता येईल. ज्या कर्मचाºयांचे वय ३१ जानेवारी २0२0 रोजी ५0 वा त्याहून अधिक असेल, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेद्वारे ८0 हजार कर्मचारी निवृत्त झाल्यास बीएसएनएलचे वर्षाला ७ हजार कोटी वाचतील. यासाठी कर्मचाºयांना प्रादेशिक कार्यालयात अर्ज करायचे आहेत. एमटीएनएलनेही याचे परिपत्रक काढले. तिथेही ५0 वर्षे वा त्यावरील वयाच्या कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्ती घेता येईल. कायम कर्मचाºयांसाठीच दोन्ही कंपन्यांची स्वेच्छानिवृत्ती योजना आहे. दोन्ही कंपन्यांनी या योजनेत कर्मचाºयांना कोणते लाभ मिळू शकतील, याची माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.या दोन्ही दूरसंचार कंपन्या आर्थिक संकटात असून, आधी त्या बंद करण्यात येतील, अशी चर्चा होती. मात्र गेल्याच महिन्यात सरकारने यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आणि त्या तगवण्यासाठी पॅकेजही जाहीर केले. तरीही कर्मचारी कपातीशिवाय स्पर्धेत टिकून राहणे अशक्य असल्याने ही योजना जाहीर करावी लागली.