Lokmat Money > बिझनेस न्यूज > Waaree Energies IPO : 'हा' IPO गुंतवणूकीसाठी खुला; उघडताच दुपटीपेक्षा अधिक सबसक्राइब; पाहा GMP सह अन्य डिटेल्स

Waaree Energies IPO : 'हा' IPO गुंतवणूकीसाठी खुला; उघडताच दुपटीपेक्षा अधिक सबसक्राइब; पाहा GMP सह अन्य डिटेल्स

Waaree Energies IPO : हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुल्या होण्याच्या आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. हा इश्यू २१ ऑक्टोबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि काही तासांतच पूर्ण सबस्क्राइब झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:05 PM2024-10-21T16:05:16+5:302024-10-21T16:05:16+5:30

Waaree Energies IPO : हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुल्या होण्याच्या आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. हा इश्यू २१ ऑक्टोबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि काही तासांतच पूर्ण सबस्क्राइब झाला.

Waaree Energies IPO Open for Investments Subscribe more than twice as it opens See GMP and other details | Waaree Energies IPO : 'हा' IPO गुंतवणूकीसाठी खुला; उघडताच दुपटीपेक्षा अधिक सबसक्राइब; पाहा GMP सह अन्य डिटेल्स

Waaree Energies IPO : 'हा' IPO गुंतवणूकीसाठी खुला; उघडताच दुपटीपेक्षा अधिक सबसक्राइब; पाहा GMP सह अन्य डिटेल्स

Waaree Energies IPO : वारी एनर्जीजचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुल्या होण्याच्या आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. हा इश्यू २१ ऑक्टोबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि काही तासांतच पूर्ण सबस्क्राइब झाला. २३ ऑक्टोबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे.
४३२१.४४ कोटी रुपयांच्या वारी एनर्जीजचा आयपीओ दुपारी २ वाजेपर्यंत दुप्पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल कॅटेगरीला २.३ पट तर क्यूआयबी कॅटेगरीला ४.३ पट सब्सक्रिप्शन मिळालं.

आयपीओचा सुमारे ५०% क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (qualified institutional buyers), ३५% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (retail investors)  आणि उर्वरित १५% नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी (non-institutional investors) राखीव आहे. या ऑफरचा प्राइस बँड १,४२७ ते १,५०३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. प्रत्येक लॉटमध्ये ९ शेअर्स ठेवण्यात आलेत. 

अॅक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस आणि आयटीआय कॅपिटल या कंपन्या या इश्यूच्या लीड मॅनेजर आहेत. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.

किती आहे जीएमपी (Waaree Energies IPO GMP)

बाजार विश्लेषकांच्या मते, अनलिस्टेड मार्केटमध्ये वारी एनर्जीजचा आयपीओ जीएमपी १४६० रुपये आहे, जो कॅप प्राइसपेक्षा ९७.१% जास्त आहे. विशेष म्हणजे इश्यू उघडण्यापूर्वी त्याचा जीएमपी १५१० रुपये होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Waaree Energies IPO Open for Investments Subscribe more than twice as it opens See GMP and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.