Join us

CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्योग जगताला म्हणाल्या, 'Wait & Watch'...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 12:00 PM

nirmala sitharaman : कोरोना परिस्थितीचे आकलन करण्यासाठी फिक्कीच्या व्हर्च्युअल कार्यक्रमातील पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंती उद्योग क्षेत्राला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह 11 राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. कोरोना संक्रमित लोकांचा बरे होण्याचा दर घसरून 84.5 टक्के झाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. औद्योगिक क्षेत्रातही याचा परिणाम होत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman)  यांनी आता कोरोनामुळे परिणाम झालेल्या उद्योग क्षेत्राला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे. (wait and watch finance minister nirmala sitharaman tells industry on second wave)

देशात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) सुरू आहे. या दुसऱ्या लाटेदरम्यान परिस्थितीचे आकलन करण्यासाठी फिक्कीच्या व्हर्च्युअल कार्यक्रमातील पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंती उद्योग क्षेत्राला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी वेट अँड वॉचचे (Wait and Watch) धोरण अवलंबण्यास सांगितले आहे.

उद्योग क्षेत्राने या परिस्थितीवर बारीक नजर ठेवावी, असे आम्हाला वाटते. या कोरोना साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र सोबत आहेत, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या. तसेच, नवीन लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांसोबत आणखी कोरोना प्रकरणांत चाचणी, ट्रॅक, उपचार, कोविड-१९ प्रोटोकॉल आणि लसीकरणामध्ये पाचपट अधिक धोरण अवलंबले गेले आहे. यामुळे येणाऱ्या काळात दिलासा मिळेल, असे आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिले.

औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा होईलउद्योग संघटना फिक्कीसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या तिमाहीच्या मूल्यांकनापूर्वी आणखी काही दिवस आधी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या. कोरोनाच्या सुरूवातीपासूनच हॉस्पिटेलिटी, हवाई वाहतूक, पर्यटन आणि हॉटेल्स यासारख्या क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेतही या क्षेत्रांचा समावेश केला आहे. ऑक्सिजनची वैद्यकीय मागणी पूर्ण होताच औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठादेखील सुरू होईल, असे अर्थमंत्र्यांनी उद्योगांना सांगितले. 

टॅग्स :निर्मला सीतारामनकोरोना वायरस बातम्याव्यवसाय