Join us

वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवरील बंदी उठविली

By admin | Published: August 07, 2015 9:35 PM

यवतमाळ : वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवर शासनाने काही वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. या बदल्यांसाठी आता निकषही निश्चित करण्यात आले आहेत. शासनाने गुरुवारी या संबंधीचे आदेश जारी केले.

सुरुवातीला सरळ सेवेने वनरक्षक म्हणून दाखल झालेल्या कर्मचार्‍याला दुसर्‍या वनवृत्तात बदलीवर पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र पती-पत्नी एकत्र राहणे, गंभीर आजार या कारणांवरून शासनाकडे मोठ्या प्रमाणात बदल्यांचे प्रस्ताव येतात. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्या करण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्ष सेवा पूर्ण केलेल्या वनरक्षकांनाच इतर वनवृत्तात बदली मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)