Lokmat Money > बिझनेस न्यूज > वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:29 AM2018-05-11T01:29:23+5:302018-05-11T01:29:23+5:30

अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे.

Wal-Mart bought Flipkart News | वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्याने कर्मचारी बनले मालामाल

नवी दिल्ली  - अमेरिकेतील वॉलमार्टने भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्याचा मोठा आर्थिक फायदा फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. वॉलमार्टने २२ अब्ज डॉलर्सना फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचा-यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे. या व्यवहारामुळे एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लानमधील (ईसॉप्स) संपत्तीचे मूल्य तब्बल १३ हजार ४५५ कोटी म्हणजेच २२ अब्ज डॉलर्सपर्यंत गेले आहे.
फ्लिपकार्टच्या सुमारे १00 आजी-माजी कर्मचा-यांकडे ईसॉप्स आहेत. या ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ईसॉप्ससाठी वॉलमार्ट १00 टक्के बायबॅक आॅफर आणणार आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचा-याला एका समभागामागे १५0 डॉलर्स म्हणजेच १0 हजार रुपये मिळतील.
मात्र आपल्याकडील समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या कर्मचाºयांना असेल. परिणामी, कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. हा फायदा होणाºयांमध्ये फोनपेचे सीईओ व संस्थापक समीर निगम, फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी आमोद मालवीय, वेबफॉर्म उडानच्या आॅपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजित कुमार यांचाही समावेश आहे.

समभागांमुळे संपत्तीत वाढ
गेल्या चार वर्षांपासून फ्लिपकार्ट आपल्या कर्मचा-यांना कंपनीचे समभाग देत असे. कर्मचा-यांना दर महिन्याला हे समभाग कंपनीला परत विकण्याची मुभा होती. फ्लिपकार्टसह अनेक कंपन्या कर्मचा-यांना समभाग देत असतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या संपत्तीतही सतत वाढ होत असे. या पद्धतीने कर्मचा-यांना समभाग देऊन त्यांच्या संपत्तीत वाढ करण्यात इन्फोसिस ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.

Web Title: Wal-Mart bought Flipkart News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.