नवी दिल्ली- ओयो रूम्स (OYO Rooms)नंतर आता तोट्यात असलेली वॉलमार्ट इंडिया (Walmart India)सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. स्टोअर्स विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या गुरुग्राममधल्या मुख्यालयात काम करणाऱ्या सोर्सिंग, अॅग्री बिझिनेस आणि एफएमसीजी विभागाच्या उपाध्यक्षांसह 100 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. वॉलमार्टनं एका टाऊनहॉलमध्ये याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वॉलमार्टला देशातल्या कॅश अँड कॅरी व्यवसायात कोणतंही भविष्य दिसत नाहीये. त्यामुळे भारतातला हा व्यवसाय विकणे किंवा फ्लिपकार्टबरोबर काम करण्याचं वॉलमार्टच्या विचाराधीन आहे. कंपनी मुंबईतलं परिपूर्ती केंद्रही बंद करण्याच्या तयारीत आहे. तसेच वॉलमार्ट भारतात जास्त स्टोअर्सही उघडणार नाही.
एप्रिलमध्ये पुन्हा होणार नोकर कपात
भारतात वॉलमार्टला नफा मिळालेला नाही. कंपनी या वर्षात अनेक लोकांना घरी बसवू शकते. ही कपात म्हणजे सुरुवात असून, एप्रिलमध्ये पुन्हा काही जणांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकतं. टाटा ग्रुपनंही वॉलमार्टचा होलसेल व्यवसाय खरेदी करण्याची चर्चा केली होती. परंतु तो सौदा फायदेशीर राहिला नाही. वॉलमार्ट इंडियाच्या बेस्ट प्राइस स्टोअर्सचा तोटा मार्च 2019पर्यंत 2180.8 कोटी रुपये एवढा होता. गेल्या आर्थिक वर्षात वॉलमार्ट इंडियाचा सेल्स 4,095 कोटी रुपये आणि निव्वळ तोटा 171.6 कोटी रुपये होता. कॅश अँड कॅरी सेगमेंटमध्ये याची प्रतिस्पर्धी कंपनी मेट्रो टॉपवर आहे. मेट्रोचे 27 स्टोअर्स असून, याचं उत्पन्न 6,500 कोटींहून अधिक आहे.
OYOनंतर आता वॉलमार्ट करणार कर्मचाऱ्यांची कपात, 100हून जणांच्या नोकऱ्या धोक्यात
ओयो रूम्स (OYO Rooms)नंतर आता तोट्यात असलेली वॉलमार्ट इंडिया (Walmart India)सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:30 PM2020-01-13T13:30:34+5:302020-01-13T13:30:41+5:30