लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अर्धे २०२४ वर्ष उलटले आहे. अनेक कंपन्यांमध्ये वार्षिक वेतनवाढ झाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. या वर्षात ८५ टक्के नाेकरदार वर्गाला पदाेन्नती, वेतनवाढ, तसेच करिअरमध्ये बदल हाेण्याची अपेक्षा आहे. ‘सिम्पली लर्न’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे.
प्रगती साध्य करायची असेल तर नवे काैशल्य शिकावे लागेल, ही भावना लाेकांच्या मनात रुजत असून त्यादृष्टीने अनेकांनी पावलेही उचलल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. सर्वेक्षणातून यावर्षी लाेकांच्या नव्या गाेष्टी शिकण्याप्रती दृष्टिकाेन माेठ्या प्रमाणात बदललेला आढळला आहे.
६५% व्यावसायिकांनी पार्टटाइम किंवा ऑनलाइन अभ्यासक्रमांना पसंती दिली. ४५% लाेकांनी करिअरमध्ये प्रगतीसाठी काैशल्य विकासाची गरज असल्याचे सांगितले.
काैशल्य विकासासाठी प्राधान्य कशाला? पार्ट टाइम अभ्यासक्रम ६५%सेल्फ स्टडी अभ्यासक्रम २५%खुल्या प्रकल्पांमध्ये सहभाग १४%काैशल्य विकासाची योजना नाही ३%ब्रेक घेऊन पूर्णवेळ अभ्यासक्रम २% हे क्षेत्र आघाडीवर३९% तंत्रज्ञान आणि संगणक११% बॅंकिंग, विमा व वित्तीय सेवा८% आराेग्य तसे जैवविज्ञान