नवी दिल्ली : तुम्ही आजपर्यंत घरातील फर्निचर, टीव्ही, एसी, फ्रीज सारख्या वस्तू भाड्याने मिळतात हे ऐकले असेल. मात्र, आयफोन X सारखा महागडा फोन महिन्याला काही हजारांत भाड्याने मिळत असले तर...किती मज्जा ना! होय अशी योजना एका कंपनीने आणली आहे. काही सिक्युरिटी डिपॉझिट आणि मिहन्याला भाडे देऊन महागडे फोन वापरता येणार आहेत...चला तर मग पाहूया कशी आहे योजना...
आजकाल नोकऱ्यांची ठिकाणे सारखी बदलत असल्याने अनेकांना घरात कायमस्वरुपी किंवा भारीभरकम फर्निचरची हौस भागवता येत नाही. तसेच एसी, टीव्ही, फ्रीजमध्ये वर्षाला मॉडेल बदलत असल्याने आज घेतलेली चांगली 30 हजाराची वस्तू आभटडेटेड होऊन जाते. यासाठी रेंटमोजो (rentmojo) ही कंपनी अशा वस्तू भाड्याने पुरविते. आता या कंपनीने महागड्या मोबाईलची हौसही पुरविण्यासाठी पाऊल टाकले आहे.
rentmojo ही कंपनी अॅपल आयफोन एक्स, गुगल पिक्सल 2, सॅमसंगचा एस 9 सारखे महागडे फोन 6 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीपर्यंत भाड्याने देणार आहे. यासाठी ग्राहकांना महिन्याकाठी ठराविक रक्कम भाडे म्हणून द्यावी लागणार आहे. तसेच फोन घेण्यासाठी काही ठराविक रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवावी लागणार आहे. ही रक्कम रिफंडबल असणार आहे. ही रक्कम प्रत्येक फोननुसार वेगवेगळी असणार आहे. जेव्हा तुम्ही फोन कंपनीला परत कराल तेव्हा ही रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे.
rentmojo च्या साईटवर अॅपलचा आयफोन X केवळ 4499 रुपये एवढ्या भाड्यावर मिळू शकतो. यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट 9998 रुपये एवढे आहे. या फोनची किंमत 89 हजारांपासून 1.1 लाखांपर्यंत आहे. सहा महिन्यांसाठी हवा असल्यास भाडे थोडे जास्त आहे. तर 18 महिन्यांनी हा फोन तुम्हाला विकतच घ्यायचा असल्यास तुम्हाला 30 हजार रुपये आणखी देऊन त्याची मालकी घेऊ शकता.
सध्या rentmojo या कंपनीकडे आयफोन X, आयफोन 8, सॅमसंगचा गॅलॅक्सी एस 9, गुगल पिक्सल 2 आणि गॅलॅक्सी नोट 8 हे फोन आहेत. आयफोन 8 3299 रुपये, गॅलॅक्सी एस 9 हा 3099, गुगल पिक्सल 2 हा 2299 व नोट 8 हा 3099 रुपये प्रतिमाह भाड्याने मिळणार आहे.