Join us

पोस्टात एफडी खातं उघडा, करसवलत मिळवा!... जाणून घ्या इतरही फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 10:16 AM

पोस्ट ऑफिस आपल्यासाठी नवनव्या योजना आणत असते. पोस्टात केलेली गुंतवणूकही सुरक्षित राहते.

नवी दिल्लीः पोस्ट ऑफिस आपल्यासाठी नवनव्या योजना आणत असते. पोस्टात केलेली गुंतवणूकही सुरक्षित राहते. पोस्टातल्या छोट्या छोट्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा मिळतो. जर आपल्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असल्यास एफडी चांगला पर्याय आहे. बँक फिक्स्ड डिपॉझिट(FD)मध्ये पैसे गुंतवल्यास 12 वर्षांत दुप्पट फायदा मिळवूत देतात. SBIच्या 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्क्यांपासून 7.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. या योजनेत गुंतवलेले 1 लाख रुपये 12 वर्षांनंतर दोन लाख होतात. पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसा लवकर दुप्पट होतो. इथे 10 वर्षांत पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिटचा पर्याय आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा त्या योजनेत पैसे गुंतवता येतात. 10 वर्षांनी दुप्पटहून अधिक परतावा मिळतो.पोस्टात आपण चार प्रकारे पैसे गुंतवू शकतो. वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. वर्षातील मुदत ठेवीवर 6.9 टक्के व्याज मिळतं, तर दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.2 टक्के व्याज दिलं जातं. तीन वर्षीय पोस्टाच्या ठेवींवर 7.4 टक्के व्याज प्राप्त होतं. तर पाच वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.7 टक्के एवढं व्याज मिळतं. याच गुंतवणुकीवर आपल्याला नव्या व्याजदरानुसार फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या या रकमेवर प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागू होत नाही.

 

  • जाणून घ्या या खात्याची खासियतपोस्टातलं एफडी खातं 200 रुपयांपासून सुरू करता येते. या खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेतून मिळणारं 10 हजार रुपयांपर्यंतचं व्याज हे पूर्णतः टॅक्स फ्री असतं. तसेच हे खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस वळतं करता येते. 
  • असं उघडू शकतो पोस्टात एफडी

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून डाऊनलोड करता येतो. एफडी उघडण्यासाठी KYC पूर्ण करावं लागतं. 

  • खातं उघडण्यासाठी लागतात हे दस्तावेज

पोस्टात खातं उघडण्यासाठी आयडी प्रूफमध्ये मतदाराचं कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफमध्ये बँकेचं पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचं बिल, फोनचं बिल, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे. 

टॅग्स :पोस्ट ऑफिससरकारी योजना