Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये

व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे. काहींनी उमेदीने सुरू केलेला व्यवसाय डबघाईला आला आहे. अशा स्थितीत या सर्वांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना लाभदायक ठरत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:28 PM2021-08-02T12:28:22+5:302021-08-02T12:29:41+5:30

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे. काहींनी उमेदीने सुरू केलेला व्यवसाय डबघाईला आला आहे. अशा स्थितीत या सर्वांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना लाभदायक ठरत आहे. 

Want to start a business? Take Rs 10 lakh | व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये

व्यवसाय सुरू करायचाय? घ्या १० लाख रुपये

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे. काहींनी उमेदीने सुरू केलेला व्यवसाय डबघाईला आला आहे. अशा स्थितीत या सर्वांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना लाभदायक ठरत आहे. 

काय आहे योजना ? 
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली.
बँकांचे नियम पूर्ण करू शकत नसल्याने ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. 
तसेच ज्यांच्याकडे स्वत:चा लघुउद्योग आहे किंवा भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याइतपत आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांनाही या योजनेंतर्गत कर्ज घेता येते.   

कर्ज कोणाला मिळू शकते ? 
पंतप्रधान मुद्रा योजना केवळ छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आहे.  
मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता भासणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या योजनेंतर्गत कर्ज मिळू शकत नाही. 
छोट्या आकाराचे असेम्ब्लिंग युनिट, सर्व्हिस सेक्टर युनिट, 
छोटे दुकानदार, फळ वा भाजी विक्रेता, ट्रकचालक, खाद्यपदार्थांची विक्री करणारे, दुरुस्तीची दुकाने चालवणारे, लघु उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक इत्यादींना पंतप्रधान मुद्रा योजनेचा  लाभ घेता येऊ शकतो.  

कर्ज किती मिळू शकते ?
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत  तीन टप्प्यांत कर्ज मिळते.
अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
अंतर्गत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
अंतर्गत ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. 
आपल्या गरजेनुसार कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे उपलब्ध होते. 

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कोणतीही सरकारी बँक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, खासगी बँक वा विदेशी बँक यांच्याकडून कर्ज घेता येऊ शकते. 
रिझर्व्ह बँकेने २७ सरकारी बँका, १७ खासगी बँका, ३१ ग्रामीण बँका, ४ सहकारी बँका, ३६ लघुवित्त संस्था आणि २५ बिगरबँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांना पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्याची परवानगी दिली आहे.  

कुठे मिळेल कर्ज ?  
अधिक माहिती mudra.org.in या संकेतस्थळावर मिळू शकते. 

Web Title: Want to start a business? Take Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.