Join us

आधारद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकता; 'असा' ठेवा तुमचा डेटा सुरक्षित, पाहा स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:38 AM

आजच्या काळात, आधार कार्ड हे आपल्या सर्वात महत्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे.

आजच्या काळात, आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपल्या सर्वात महत्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. आधारशिवाय आपली अनेक कामं अडकू शकतात. आधार कार्डचा वापर आता फक्त नवीन सिम खरेदी करण्यासाठीच नाही तर बँक खातं (Bank Account) उघडण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी केला जातो.आधार बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर खोटे आर्थिक व्यवहार करण्यासाठी, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी, तसंच त्यातील डेटा चोरी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे आधार कार्डमध्ये नोंदवलेल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या आधारचा बायोमेट्रिक्स डेटा लॉक करू शकतो, जेणेकरून आपली माहितीही सुरक्षित राहते.... तोवर वापरता येत नाहीबायोमेट्रिक तात्पुरतं लॉक केल्यानंतर, तुम्ही ते अनलॉक केल्याशिवाय वापरू शकत नाही. अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही. खाली दिल्याप्रमाणे तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा सहजपणे लॉक किंवा अनलॉक करू शकता.असं करा लॉक

  • सर्व प्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर, ‘माय आधार’ टॅबमध्ये ‘आधार सेवा’ पर्याय निवडा आणि नंतर ‘लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स’ पर्याय निवडा.
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन टॅब उघडेल. तुमचं बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी पुढे जाण्यासाठी, तुम्ही टिक बॉक्स निवडणं आवश्यक आहे
  • बॉक्स निवडल्यानंतर, ‘लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स’ वर क्लिक करा.
  • यानंतर, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एन्टर करा आणि नंतर ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.
  • OTP नंतर, UIDAI वेबसाइटवरून तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल.
  • आपण सहमत असल्यास, 'अनेबल लॉकिंग फीचक'वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचं बायोमेट्रिक्स लॉक केले जातील.
टॅग्स :आधार कार्ड