Lokmat Money > बिझनेस न्यूज > वृद्धापकाळात शांततेत जीवन जगायचंय? मग रिटायरमेंटपूर्वी विसरू नका 'हे' महत्त्वाचं काम

वृद्धापकाळात शांततेत जीवन जगायचंय? मग रिटायरमेंटपूर्वी विसरू नका 'हे' महत्त्वाचं काम

अनेकदा आपण बचत, गुंतवणूक आणि निवृत्तीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करतो, परंतु एका महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो. पाहुया नक्की आपण कसं आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखानं जगू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:15 IST2025-04-16T15:14:49+5:302025-04-16T15:15:55+5:30

अनेकदा आपण बचत, गुंतवणूक आणि निवृत्तीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करतो, परंतु एका महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो. पाहुया नक्की आपण कसं आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखानं जगू शकतो.

Want to live a peaceful life in old age Then don t forget important task before retirement | वृद्धापकाळात शांततेत जीवन जगायचंय? मग रिटायरमेंटपूर्वी विसरू नका 'हे' महत्त्वाचं काम

वृद्धापकाळात शांततेत जीवन जगायचंय? मग रिटायरमेंटपूर्वी विसरू नका 'हे' महत्त्वाचं काम

निवृत्ती हा एक टर्निंग पॉईंट आहे जिथे एखाद्या व्यक्तीला आपल्या कष्टानं कमावलेला पैसा शांततेत, कोणतीही चिंता न करता, कोणत्याही ओझ्याशिवाय वापरायचा असतो. अनेकदा आपण बचत, गुंतवणूक आणि निवृत्तीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करतो, परंतु एका महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे आपली संपूर्ण निवृत्ती तणावमुक्त होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया असं काय आहे जे तुमचं आयुष्य वेळेत बदलू शकते.

जर तुम्ही निवृत्तीपूर्वी तुमचं सर्व कर्ज तर तुमची निवृत्ती अधिक सोपी आणि आरामदायी होऊ शकते.

दर महिन्याला ईएमआयपासून मुक्ती

कल्पना करा की निवृत्तीनंतर आपल्याला दर महा ईएमआय भरावा लागणार नाही, यामुळे आपण आपल्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करू शकता - जसे की प्रवास, कुटुंबासमवेत वेळ घालवणं किंवा आपले छंद जोपासणं.

पैशाच्या टेन्शनपासून सुटका

त्या वेळीही कर्ज असेल तर मानसिक ताण वाढू शकतो.

आपण अधिक बचत करू शकाल

जर तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड केली तर नंतर तुम्ही अधिक बचत करू शकता.

कुटुंबाचं भवितव्यही सुरक्षित 

जर तुमच्याकडे ही लाइफ इन्शुरन्स असेल तर तो सेफ्टी नेटसारखं काम करतो. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपलं कुटुंब सुरक्षित राहतं. अन्यथा एखादी अनुचित घटना घडल्यास जीवन विम्याचे पैसे कर्ज फेडण्यातच खर्च करावे लागू शकतात.

निवृत्तीपूर्वी कर्ज फेडणं हे एक हुशारीचं काम आहे. यामुळे तुम्हाला ना केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळचं, तर तुम्ही आपल्या कुटुंबालाही सुरक्षित भविष्य देऊ शकता. यासाठी वेळेतच कर्ज संपवण्याचं नक्कीच प्लॅनिंग करा.

Web Title: Want to live a peaceful life in old age Then don t forget important task before retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.