नवी दिल्ली: करपात्र व्यक्तीला आयकर भरावाच लागतो, मात्र काही नियमांचा फायदा घेऊन कर कमी केला जाऊ शकतो. अशी सुविधा 'क्लबिंग'च्या नियमाद्वारे मिळते. याद्वारे आपले काही करपात्र उत्पन्न पत्नी आणि मुलांकडे हस्तांतरित करून कर बचत केली जाऊ शकते.
नियमानुसार पत्नीच्या खात्यावर पैसे जमा केले, तिच्या नावे गुंतवणूक केली, तर त्यातून करबचतीचा लाभ मिळू शकतो. कलम ६० ते ६४ यामध्ये ही तरतूद आहे. वैयक्तिक करदात्यास हा नियम लागू आहे.
कसा वाचेल कर?
वास्तविक तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे काही गुंतवणूक केली किंवा तिच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यावर व्याज किंवा इतर लाभ मिळाले तरी त्यावर तुम्हाला आयकर भरावा लागतो. मात्र हाच पैसा जर तुम्ही पत्नीला 'बक्षीस' म्हणून दिला तर त्यावरील उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही.