निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
By admin | Published: September 30, 2014 9:39 PM
सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा येथील काही मतदरांची नावे शेजारच्या किनखेड या गावातील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. ही नावे काढून ती आमच्या गावातील यादीत टाकण्यात यावीत, अशी मागणी धानोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही धानोरावासीयांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.
सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा येथील काही मतदरांची नावे शेजारच्या किनखेड या गावातील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. ही नावे काढून ती आमच्या गावातील यादीत टाकण्यात यावीत, अशी मागणी धानोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही धानोरावासीयांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे. धानोरा येथील ८० ग्रामस्थांची नावे शेजारच्या किनखेड गावातील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. याबाबत गत अनेक वर्षांपासून तक्रारी केल्यानंतरही मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आली नाही. या दोन्ही गावच्या ग्रामपंचायती वेगवेगळ्या असल्याने धानोरा येथील ८० मतदारांना निवडणुकीच्या वेळी मतदान करण्यासाठी किनखेड येथे जावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. निवडणूक विभागाने येथील मतदार यादीत त्वरित दुरुस्ती करावी व आमची नावे धानोरा येथील मतदार यादीत टाकावी, अशी मागणी मदन धर्माजी राऊत व इतरांनी बार्शीटाकळी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)