Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये धमाका करण्याच्या तयारीत वॉरेन बफे, करणार मोठी डील

क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये धमाका करण्याच्या तयारीत वॉरेन बफे, करणार मोठी डील

ही क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीतील सर्वात मोठी डील असेल. या डीलचे मूल्य 35.3 अब्ज डॉलर एवढे असेल, असे मानले जाते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 02:31 PM2024-02-21T14:31:41+5:302024-02-21T14:32:21+5:30

ही क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीतील सर्वात मोठी डील असेल. या डीलचे मूल्य 35.3 अब्ज डॉलर एवढे असेल, असे मानले जाते. 

Warren Buffet to be acquire credit card issuer company will make a big deal | क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये धमाका करण्याच्या तयारीत वॉरेन बफे, करणार मोठी डील

क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये धमाका करण्याच्या तयारीत वॉरेन बफे, करणार मोठी डील

अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) एक मोठी डील करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची गुंतवणूक असलेली बँग कॅपिटल वन (Capital One) क्रेडिट कार्ड इश्यू करणारी कंपनी डिस्कव्हर फायनान्शियल (Discover Financial) खरेदी करणार असल्याचे समजते. ही क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीतील सर्वात मोठी डील असेल. या डीलचे मूल्य 35.3 अब्ज डॉलर एवढे असेल, असे मानले जाते. 

या डीलनंतर कॅपिटल वन, अॅसेटचा विचार करता जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनेल. हिचा सामना जेपी मोर्गन आणि सिटीग्रुपसोबत असेल. ही डील  झाल्यास मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीत कॅपिटल वनच्या शेअरहोल्डर्सचा वाटा 60 टक्के असेल. तर उर्वरित हिस्सेदारी डिस्कव्हरच्या शेअरहोल्डर्सजवळ असेल. अमेरिकेमध्ये क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमधील आतापर्यंतची सर्वात मोठी डील बँक ऑफ अमेरिकेच्या नावावर आहे. या बँकेने 2005 मध्ये एमबीएनए कॉर्प 35.2 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती. मात्र आता वॉरेन बफे याहून मोठी डील करत आहेत. 

जगातील टॉपच्या श्रीमंतांच्या यादीत बफे यांचा समावेश आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, बफे यांची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर एवढी आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत  सहाव्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 15.4 अब्ज डॉलरने वाढली आहे.

बफे यांचा पोर्टफोलियो -
गेल्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या आकेडेवारीनुसार, बफे यांच्या एकूण पोर्टफोलियोच्या अर्धा भाग अॅपलमध्ये आहे. बफे यांच्या पोर्टफोलियोतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोटा शेअर बँक ऑफ अमेरिकेचा आहे. यात त्यांच्या एकूण पोर्टफोलियोचा नववा हिस्सा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकन एक्सप्रेस. त्यांच्या पोर्टफोलियोचा 7.2 टक्के हिस्सा या कंपनीत आहे. याच बरोबर कोकोकोलामध्येही त्यांच्या पोर्टफोलियोचा 7.1 टक्के हिस्सा आहे.  याशिवाय, बफे यांनी शेवरॉन, ऑक्सिडेंटल पेट्रोलियम, Kraft Heinz आणि मूडीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

Web Title: Warren Buffet to be acquire credit card issuer company will make a big deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.