Join us

वॉरेन बफेंचा २८ लाख कोटींचा प्लान, जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार काय करणार?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 1, 2025 13:39 IST

Warren Buffett News: जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या डोक्यात सध्या काय शिजत आहे हे जाणून घेणं थोडं अवघड आहे, परंतु त्यांचं एक कृत्य लोकांना काहीतरी मोठ्या गोष्टीचा आभास देत आहे.

Warren Buffett News: जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या डोक्यात सध्या काय शिजत आहे हे जाणून घेणं थोडं अवघड आहे, परंतु त्यांच्याद्वारे कॅश फ्लो वाढवण्याची माहिती लोकांना काहीतरी मोठ्या गोष्टीचा आभास देत आहे. अलीकडच्या काळात वॉरेन बफे यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूक समूह बर्कशायर हॅथवेनं आपली होल्डिंग्स विकून २८ लाख कोटी रुपयांचा (३३४ अब्ज डॉलर) निधी उभारला आहे.

२००८-०९ ची मंदी सुरू होण्यापूर्वी वॉरेन बफे यांनी नेमकं हेच केलं होतं. आता पुन्हा एकदा वॉरेन बफे यांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा मंदी येणार आहे की काय असे प्रश्न निर्माण होत आहेत. खरंच तसं असेल तर २००८-०९ प्रमाणे  वॉरेन बफे कोणाचे संकटमोचक होणार आणि कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फ्यूचर प्लान मजबूत करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन

किती मोठा आहे फंड?

वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक समूह बर्कशायर हॅथवेनं उभारलेला निधी भारतीय चलनात २८ लाख कोटी रुपये इतका आहे. या फंडातून वॉरेन बफे एका झटक्यात कोका-कोलासारख्या बाजारमूल्याच्या ३० कंपन्या खरेदी करू शकतात. वॉरेन बफे यांनी जो निधी जमा केला आहे तो त्यांच्या एकूण मालमत्तेच्या केवळ ३० टक्के आहे.

यापूर्वीही अंदाज खरे

मार्च २००० असो किंवा २००८-०९ ची मंदी, वॉरेन बफे यांनी आपले आधीचे भाकीत खरं असल्याचं सिद्ध केलंय. मार्च २००० मध्ये डॉट कॉमचा बबल फुटला होता. खरं तर १९९० ते २००० या काळात तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर त्यात बरीच गुंतवणूक झाली, त्यामुळे या कंपन्या ओव्हरव्हॅल्यूड झाल्या, ज्यामुळे जेव्हा हा बबल फुटला तेव्हा वॉरेन बफे यांच्या कंपनीनं टेक कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी वाढवली. त्याचबरोबर त्यांनी या काळात कुक बिझनेसही टेकओव्हर केला.

२००८-०९ च्या मंदीच्या पार्श्वभूमीवर वॉरेन बफे यांच्या बर्कशायर ने मंदीपूर्वी आपला फंड वाढवला होता आणि मंदीच्या काळात गोल्डमन सॅक्स आणि जनरल इलेक्ट्रिक सारख्या अडचणीत सापडलेल्या परंतु बलाढ्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याचा वापर केला होता. आता पुन्हा एकदा बर्कशायर हॅथवेकडे विक्रमी रोकड आहे. अशा परिस्थितीत वॉरेन बफे काय भाकीत वर्तवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वॉरेन बफे यांनी काय सांगितलं?

२०२४ च्या चौथ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेच्या कॅश फ्लोमध्ये १२.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वॉरेन बफे म्हणाले की, अमेरिकन शेअर्स ओव्हरव्हॅल्यूड आहेत आणि वाजवी किमतीत उपलब्ध असलेला चांगला व्यवसाय ओळखणे कठीण आहे. त्याचबरोबर वॉरेन बफे यांच्या कंपनीचा कॅश फ्लो वाढल्यानं मोठी घसरण होणार आहे किंवा ते मोठं अधिग्रहण करण्याच्या तयारीत आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक