Join us  

Warren Buffett : वॉरेन बफे यांचा मोठा दावा, शेअर मार्केट गुंतवणुकदारांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 1:13 PM

Warren Buffett : सध्या शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बफे यांनी हा मोठा दावा केला आहे.

Warren Buffett: दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे(Warren Buffett) यांचे असंख्य चाहते आहेत. शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे बफे यांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष असते. बफे यांच्या प्रत्येक विधानाचा मोठा अर्थ असतो. कधी-कधी बफे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवरही भाष्य करतात. आताही त्यांनी शेअर बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला आहे. 

50% घट सहन करण्यासाठी तयार रहावॉरन बफेटने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सल्ला देत आहे. गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या 50% घसरणीसाठी तयार राहावे, असे बफे म्हणाले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वॉरेन बफे व्हिडीओजच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे.

पैसे उधार घेणारे उद्ध्वस्त होतील!वॉरन बफे यांनी व्हिडिओमध्ये असेही म्हटले की, बर्कशायरच्या इतिहासात असे तीन वेळा घडले आहे, जेव्हा शेअर बाजार 50 टक्क्यांनी घसरला आहे. उधार घेतलेल्या पैशातून शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही उद्धवस्त होऊ शकता, असा इशाराही त्यांनी गुंतवणूकदारांना दिला.

गुंतवणुकीचा निर्णय स्वतःच्या मनाने घ्याते म्हणाले की, बर्कशायरचा स्टॉक कमी झाला, तेव्हा कंपनीची काहीही चूक नव्हती. गुंतवणूकदाराचे मन स्वच्छ असले पाहिजे, अन्यथा चुकीच्या वेळी शेअर्स खरेदी-विक्री करण्यात तुमचे आयुष्य व्यतीत होईल आणि तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागेल. तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये जास्त काळ गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही तो खरेदी करू नये. ज्याप्रमाणे तुम्ही शेती दीर्घकाळासाठी तुमच्याकडे ठेवता, त्याचप्रमाणे शेअर्स ठेवण्यासाठी तुम्हाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार