Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल

भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल

ब्रिटनही आर्थिक तंगीमुळे मेटाकुटीला आले आहे. एका मोठ्या शहराला दिवाळखोर घोषित करण्य़ात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:32 PM2023-09-07T12:32:17+5:302023-09-07T12:35:14+5:30

ब्रिटनही आर्थिक तंगीमुळे मेटाकुटीला आले आहे. एका मोठ्या शहराला दिवाळखोर घोषित करण्य़ात आले आहे.

was looted India, Britain's second largest city declared bankrupt; Birmingham... you must have heard the name | भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल

भारताला लुटले, त्या ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर दिवाळखोर घोषित; बर्मिंगहॅम... नाव तर ऐकलेच असेल

ब्रिटनमधून आताची एक सर्वात मोठी बातमी येत आहे. भारतभूमीला शेकडो वर्षे लुटून आपली तुंबडी भरणाऱ्या ब्रिटिशांना आता दिवाळखोरीचे दिवस पहावे लागत आहेत. ब्रिटनचे दुसरे सर्वात मोठे शहर बर्मिंगहॅम (Birmingham City Bankrupt) दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे.

बर्मिंगहॅम शहराचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. त्या शहराच्या सिटी काऊंसिलने दिवाळखोर झाल्याचे कबूल केले आहे आणि मंगळवारी कलम ११४ नोटीस दाखल केली आहे. यानुसार शहरात फक्त आवश्यक सेवांवरील खर्च केला जाणार असून अन्य खर्च तत्काळ प्रभावाने रोखण्यात आले आहेत. 

बर्मिंगहॅममध्ये समान वेतनाच्या 954 मिलियन डॉलरच्या दाव्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शिवाय ब्रिटनही आर्थिक तंगीमुळे मेटाकुटीला आले आहे. यामुळे शहराला दिवाळखोर घोषित करण्य़ात आले आहे. यावरून स्पष्ट होतेय की, बर्मिंघम सिटीचा बजेटपेक्षा जास्त खर्च झाला आहे. 

बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने दाखल केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की नवीन समान वेतनाच्या दाव्यांची संभाव्य किंमत £650 दशलक्ष (सुमारे $816 दशलक्ष) आणि £760 दशलक्ष (सुमारे $954 दशलक्ष) दरम्यान असेल. हा खर्च भरून काढण्यासाठी शहराकडे पुरेसे मार्ग नाहीत. बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल दहा लाखांहून अधिक लोकांना सेवा पुरवते. 

Web Title: was looted India, Britain's second largest city declared bankrupt; Birmingham... you must have heard the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.