आशिया चषक सुरू होण्यास १० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांना आता हे सर्व सामने मोफत पाहता येणार आहेत. म्हणजेच सामन्याचा आनंद घेण्यासाठी पैसे खर्च करून सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिस्ने प्लस हॉस्टस्टारने यासाठी विशेष मोहीम सुरू केलीये. 'फ्री ऑन मोबाईल' अशी याला टॅगलाइन देण्यात आलीये.
आशिया चषक स्पर्धेतून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन; तिलक वर्माची सरप्राईज निवड
आशिया चषकापूर्वी डिस्ने प्लस हॉटस्टारनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओही जारी केलाय. यातून क्रिकेट चाहत्यांना आशिया चषक आणि वर्ल्ड कप स्पर्धेचा मोफत आनंद कसा लुटता येईल याची माहिती देण्यात आली आहे. मोहिमेसाठी #FreeMeinDekhteJao हा हॅशटॅग देण्यात आलाय. ही संकल्पना तन्मय भट्ट, देविया बोपण्णा आणि टीम मूनशॉट यांची आहे.
आशिया कप २०२३ पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार असून, ही स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार असून एकूण १३ सामने खेळवले जातील.
Landing clearance mile na mile, Free mein Asia Cup aur ICC Men’s Cricket World Cup toh mil gaya!
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) August 21, 2023
Ab dekho duniya ke sabse bade tournaments ke sabhi matches, kahin bhi, apne mobile par, bilkul free sirf Disney+ Hotstar mobile pe pic.twitter.com/IRFC7SpBHb
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन ( राखीव खेळाडू)