Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंढरपूरला दोन दिवसाआड पाणी

पंढरपूरला दोन दिवसाआड पाणी

०७पंड१०

By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30

०७पंड१०

Water from Pandharpur for two days | पंढरपूरला दोन दिवसाआड पाणी

पंढरपूरला दोन दिवसाआड पाणी

पंड१०
पंढरपूर येथील जुन्या दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधार्‍यातील पाणी पातळी कमी झाली आहे. (छाया - सचिन कांबळे)
पंढरपूर : शहराला पाणीपुरवठा करणारा पाणीसाठा सध्या वजा असून फक्त मोजकेच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.
२९ ऑगस्टपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता बंधार्‍यातील पाणी पातळी पूर्णपणे खालावली आहे. सध्या एक दिवसाआड सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यात वाढ करून तो दोन दिवसाआड करण्यात येणार आहे. दरम्यान नगराध्यक्षा साधना भोसले, नगरसेविका मनीषा कोताळकर, श्रीदेवी बंदप˜े यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याशी पाण्याबाबत चर्चा केली. पाणी सोडण्याच्या वेळेत कपात करून रोज पाणी सोडता येईल का यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली. सध्या पाणी कमी असल्याने मुख्याधिकार्‍यांनी यातही आणखीन वाढ करावी लागेल, असे सांगितले.
कोट ::::::::::::::::::::
पंढरपूर नगरपालिकेकडून होत असलेला पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा वापर नागरिकांनी गाड्या धुणे, बांधकाम, बागकाम व अन्य कामांसाठी करू नये. त्याचबरोबर पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- शंकर गोरे
मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका, पंढरपूर

Web Title: Water from Pandharpur for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.