Lokmat Money > बिझनेस न्यूज > लहरी निसर्गाचा देशातील ५७२ जिल्ह्यांना फटका

लहरी निसर्गाचा देशातील ५७२ जिल्ह्यांना फटका

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देशभरातील ५७२ जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांचे यात मोठे नुकसान झाले तर यवतमाळसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे अल्प नुकसान झाल्याचे

By admin | Published: January 20, 2016 03:07 AM2016-01-20T03:07:46+5:302016-01-20T03:07:46+5:30

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देशभरातील ५७२ जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांचे यात मोठे नुकसान झाले तर यवतमाळसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे अल्प नुकसान झाल्याचे

The wave of nature has hit 572 districts of the country | लहरी निसर्गाचा देशातील ५७२ जिल्ह्यांना फटका

लहरी निसर्गाचा देशातील ५७२ जिल्ह्यांना फटका

रूपेश उत्तरवार,  यवतमाळ
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देशभरातील ५७२ जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांचे यात मोठे नुकसान झाले तर यवतमाळसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे अल्प नुकसान झाल्याचे आयसीआरच्या मॅपिंग सर्वेक्षणातून पुढे आले आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बलियान यांनी राज्याला सादर केलेल्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला
आहे.
वातावरणातील फेरबदलाचा फटका प्रत्येक पिकाला बसला. देशभरातील ६७६ पैकी ५७२ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन परिषदेने आपला सॅटेलाईट मॅपिंग अहवाल पाठविला आहे. हा अहवाल धक्कादायक आहे. यामध्ये काही जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुुकसान झाले. काही जिल्ह्यांचे अल्प तर काही जिल्ह्यांचे अत्यल्प नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यावरून दुष्काळी मदत वाटपाचा सुधारित अहवाल ठरण्याची चिन्हे आहेत.
या अहवालात राज्यातील १२ जिल्हे प्रभावित आहेत तर यवतमाळसह सहा जिल्हे अल्प प्रभावित आहेत. सात जिल्ह्यांचे अत्यल्प नुकसान झाले आहे. खरिपासोबत रबीच्या उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. यामुळे खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात २ ते १८ टक्के घट येण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला. मात्र आयसीआर आणि कोरडवाहू प्रकल्पाच्या सॅटेलाईट सर्वेक्षणामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाच्या नुकसानीची नोंदच झाली नाही.

Web Title: The wave of nature has hit 572 districts of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.