Lokmat Money > बिझनेस न्यूज > “आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी

“आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी

Gautam Adani On Narendra Modi : आपला व्यवसाय मोठा होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा निराधार असल्याचे अदानी यांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:31 AM2023-01-08T08:31:17+5:302023-01-08T08:31:48+5:30

Gautam Adani On Narendra Modi : आपला व्यवसाय मोठा होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा निराधार असल्याचे अदानी यांनी सांगितले.

We are doing business in 22 states not all of them have BJP government richest businessman gautam adani on relation with pm narendra modi | “आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी

“आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी

Gautam Adani On Narendra Modi : “आपला व्यवसाय मोठा होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा निराधार आहेत, कारण आपण विरोधीपक्षांच्या राज्यातही व्यवसाय करत आहोत. प्रत्येक राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं आमचं ध्येय आहे,” असं वक्तव्य अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी केलं. आम्ही केरळमध्ये काम करत आहोत, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतही काम करत आहोत, नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी, केसीआर.. ज्या ठिकाणी स्थानिक पक्षांचं सरकार आहे तिकडेही आम्ही करतोय. आपल्याला यापैकी कोणासोबतही काम करण्यास समस्या आली नसल्याचं अदानी यांनी स्पष्ट केलं.

“तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकतनाही. तुम्ही त्यांच्याशी धोरणात्मक चर्चा करू शकता. तुम्ही देशहिताच्या चर्चा करू शकता. परंतु जे धोरण तयार होतं ते सर्वांसाठी तयार होतं, ते केवळ अदानी समूहासाठी तयार होत नाही,” असं अदानी यांनी स्पष्ट केलं. इंडिया टीव्हीवर आयोजित कार्यक्रमात गौतम अदानी यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.

“आपल्या समूहाला प्रमोट केलं जातंय हा एक गैरसमज आहे. यामुळे बँका आणि सामान्यांची बचत धोक्यात येऊ शकते. गेल्या सात आठ वर्षांमध्ये आमच्या कर्जामध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढलं आहे. आज आमची एकूण संपत्ती कर्जाच्या तुलनेत तीन ते चार पट झाली आहे,” असं त्यांनी नमूद केलं. गुंतवणूक करणं आमचं सामान्य काम आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निमंत्रणावरून मी गुंतवणूकदारांच्या संमेलनातही गेलो. त्यानंतर राहुल गांधींनी आमच्या राजस्थानातील गुंतवणूकीचं कौतुक केलं. राहुल गांधींची धोरणंही विकासविरोधी नाहीत याची आपल्याला कल्पना असल्याचं अदानी यांनी राजस्थानमध्ये ६८ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा उल्लेख करत सांगितलं.

Web Title: We are doing business in 22 states not all of them have BJP government richest businessman gautam adani on relation with pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.