Lokmat Money > बिझनेस न्यूज > "आम्ही निर्णय घेण्यात गंभीर चुका..," GoMechanic मधून अचानक ७० टक्के कर्मचाऱ्यांना काढलं

"आम्ही निर्णय घेण्यात गंभीर चुका..," GoMechanic मधून अचानक ७० टक्के कर्मचाऱ्यांना काढलं

गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:12 PM2023-01-18T13:12:51+5:302023-01-18T13:13:13+5:30

गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे.

We made serious mistakes in decision making GoMechanic suddenly laid off 70 percent of its employees co founder informed in LinkedIn post | "आम्ही निर्णय घेण्यात गंभीर चुका..," GoMechanic मधून अचानक ७० टक्के कर्मचाऱ्यांना काढलं

"आम्ही निर्णय घेण्यात गंभीर चुका..," GoMechanic मधून अचानक ७० टक्के कर्मचाऱ्यांना काढलं

गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे. ट्विटर, फेसबुक, शेअरचॅट अशा अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यानंतर आता गोमेकॅनिक या कंपनीनं अचानक आपल्या कंपनीतील ७० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून स्टार्टअप्स आणि टेक कंपन्या सातत्यानं कर्मचारी कपात करत आहेत. आता यामध्ये ऑटोमोबिल आफ्टरसेल्स सर्व्हिस देणारी कंपनी GoMechanic चं नावही जोडलं गेलंय. कंपनीनं आपल्या ७० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे, अशी माहिती कंपनीचे को-फाऊंडर अमित भसीन यांनी १८ जानेवारी रोजी एका ब्लॉग पोस्टद्वारे दिली.

“आम्ही निर्णय घेण्यात गंभीर चुका केल्या कारण आम्ही प्रत्येक पावलावर वाढीचं अनुसरण केलं. विशेषत: आर्थिक अहवालाच्या संदर्भात, ज्याचा आम्हाला मनापासून खेद वाटतो,” असं भसीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. "आम्ही या सद्य परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि आम्ही भांडवली उपाय शोधत असताना व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. ही पुनर्रचना वेदनादायक ठरणार आहे आणि दुर्दैवाने आम्हाला जवळपास ७०  कर्मचारी वर्गाला काढावं लागणार आहे. याशिवाय, एक थर्ड पार्टी फर्म व्यवसायाचं ऑडिट करेल," असंही त्यांनी नमूद केलं. गुरुग्राम स्थित गोमेकॅनिक कंपनीची स्थापना २०१६ मध्ये कुशल करवा आणि अमित भसीन यांच्यासह चार मित्रांनी केली होती.

Web Title: We made serious mistakes in decision making GoMechanic suddenly laid off 70 percent of its employees co founder informed in LinkedIn post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.