नवी दिल्ली : भारताला येत्या काही महिन्यांमध्ये निर्यात वाढविण्याची मोठी संधी आहे. सरकारचे भरपूर प्रोत्साहन आणि आक्रमक विपणन धोरण यामुळे भारत आगामी ३ वर्षांत अमेरिकेसह १० देशांना ११२ अब्ज डॉलरची निर्यात करू शकतो. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स’ने (फिओ) एका अभ्यासात ही माहिती दिली. हिरे, दागिने आणि स्मार्टफाेन यासारखी उत्पादने देशाच्या निर्यातीला टॉप गिअरमध्ये नेऊ शकतात.
‘फिओ’ने म्हटले की, घरगुती वस्तूंच्या निर्यातीला चालना देण्यासाठी या देशांतील भारतीय मिशन्सनी बाजारपेठेतील प्रवेशाशी संबंधित समस्या ओळखून योग्य उपाययोजना करायला हव्यात. शुल्केतर अडचणींमुळे निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो.
या देशांत सर्वाधिक संधी -
- ११२ अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी सर्वाधिक निर्यात अमेरिका, चीन आणि व्हिएतनाम या देशांत होऊ शकते.
- १०.४८ डॉलरची रत्ने व आभूषणे युएई जगातून आयात करतो.
- ३.१२% वाटा भारताचा आहे.
युएईमध्ये ३० टक्के दागिने भारतीय
भारताची रत्ने व आभूषणे यांना जगभरात मागणी आहे. संयुक्त अरब आमिरातीत (युएई) आयात होणाऱ्या एकूण रत्ने व आभुषणांपैकी तब्बल ३० टक्के रत्ने व आभूषणे एकट्या भारतातून येतात. ‘रत्ने व आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदे’ने ही माहिती दिली आहे.
या उत्पादनांना जगभरातून माेठी मागणी
अमेरिका - ३.७ अब्ज डॉलरचे हिरे, २.२ अब्ज डॉलरची वाहने. १.४ अब्ज डॉलरचे दागिने. १.३ अब्ज डॉलरचे हँडसेट.
चीन : वाहन, आभूषण, झिंगे, मानवी केस, काळे मिरे आणि ग्रॅनाइट.