पेईचिंग : रियल इस्टेट कंपनी वांडा ग्रुपचे संस्थापक वांग जियानलिन यांची संपत्ती एका वर्षात ११०० अब्ज रुपयांनी वाढली आहे. बिझनेस मॅगजिन फोर्ब्जने ही यादी जाहीर केली आहे.वांग जियानलिन यांची संपत्ती मागील वर्षी ८७१ अब्ज होती, तर यावर्षी ती १९८० अब्ज झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत ते पहिल्या स्थानावर आले आहेत.चीनच्या अनेक अब्जाधीशांना त्यांनी मागे टाकले आहे. त्यात अलिबाबांच्या जॅक मा यांचाही समावेश आहे.न्यूयॉर्कमध्ये शेअरबाजारात झालेल्या घसरणीनंतर जॅक मा यांची कंपनी आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार चीनमध्ये १०० अब्जाधीशांकडे २९७०० अब्जची संपत्ती आहे. ही संपत्ती एका वर्षात २० टक्क्यांनी वाढली आहे.
एका वर्षात ११०० अब्जने वाढली संपत्ती
By admin | Published: October 26, 2015 11:17 PM