Lokmat Money > बिझनेस न्यूज > ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर

ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर

निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी हाेते. मात्र, यावेळी ज्येष्ठांनी आयकराच्या बाबतीत सर्वांनाच चकित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:14 AM2023-04-11T04:14:26+5:302023-04-11T04:15:03+5:30

निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी हाेते. मात्र, यावेळी ज्येष्ठांनी आयकराच्या बाबतीत सर्वांनाच चकित केले आहे.

Wealth of seniors increased Paid income tax of more than one lakh kyats | ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर

ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर

नवी दिल्ली :

निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी हाेते. मात्र, यावेळी ज्येष्ठांनी आयकराच्या बाबतीत सर्वांनाच चकित केले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी यंदा १ लाख काेटी रुपयांपेक्षा अधिक आयकर भरला आहे. यात यावेळी ३५ टक्क्यांहून अधिक वाढ नाेंदविण्यात आली आहे.

६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांची गणना ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाेते. काेराेनाकाळात व्याजदर कमी हाेते. त्यामुळे मुदत ठेव याेजनावर परतावा कमी हाेता. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांनी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये जास्त पैसे गुंतविले. सरकारने डिव्हिडंड अर्थात लाभांशावर आयकर आहे.  २०२० पासून गुंतवणूकदारांना गेल्या दाेन वर्षांपासून त्यावर कर भरावा लागत आहे. काेराेनाकाळात शेअर बाजार काेसळला हाेता. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीवरही दमदार परतावा मिळाला आहे.

- १६.६१ लाख काेटी रुपयांचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन २०२२-२३ या वर्षात झाले आहे.
- २४ टक्के वाटा हा वैयक्तिक करदात्यांचा आहे.
- १.१३ लाख काेटी रुपयांचा आयकर ज्येष्ठ नागरिकांनी भरला आहे.

हे उत्पन्नही वाढले
ज्येष्ठांची पेन्शन गेल्या वर्षी वाढली. तसेच वन रॅंक-वन पेन्शनअंतर्गत सेवानिवृत्त सैनिकांना ५७ हजार काेटींची थकबाकी मिळाली. यामुळे ते आयकराच्या कक्षेत आले.

कर भरणाऱ्या ज्येष्ठांची संख्या गेल्या आर्थिक वर्षात १८.६ टक्क्यांनी वाढून ८६.७१ लाख एवढी झाली.

ज्येष्ठ नागरिकांनी भरलेला कर
२०१९-२०    ७०,२६२
२०२०-२१    ७९,८०६
२०२१-२२    ८३,७५६
२०२२-२३    १,१३,४५८

(काेटी रुपयांमध्ये)


 

Web Title: Wealth of seniors increased Paid income tax of more than one lakh kyats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.