Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत

केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत

करोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटीर, लघु व मध्यम उद्योजकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे विशेष पॅकेज जाहिर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:22 AM2020-05-14T06:22:14+5:302020-05-14T06:22:33+5:30

करोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटीर, लघु व मध्यम उद्योजकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे विशेष पॅकेज जाहिर केले.

 Welcome to the schemes announced by the Central Government for industries | केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत

केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत

करोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटीर, लघु व मध्यम उद्योजकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे विशेष पॅकेज जाहिर केले. त्या अनुषंगाने आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना कोणते लाभ होणार याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जाहिर केलेल्या १५ योजनांपैकी ६ योजना या लघु व कुटीर उद्योगांसाठी आहेत. एमएसएमइकरीता ग्यारंटीशिवाय कर्ज उपलब्ध होणार असून त्यासाठी ३ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्याचा लाभ ४५ लाख उद्योजकांना होणार आहे. अडचणीत असलेल्या लघु व मध्यम उद्योजकांना मदत करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद, उद्योगाच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी रूपये देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे १०० कोटी पर्यंतचे जे उद्योग आहे त्यांनाही कर्जामध्ये दिलासा देण्याचे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे. एकंदरीतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना या पॅकेजच्या माध्यमातून बळकटी दिली आहे़
- संतोष मंडलेचा,
अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स

स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे त्यांना ग्लोबल बनवावे याकरीता २०० कोटी रु पयां- पर्यंतचे टेंडर स्थानिक पातळीवर भरता येणार, जून ते आॅगस्ट या ३ मिहन्यांचे पीएफचे कॉन्ट्रीबुशन सरकार भरणार. एमएसएमइची व्याख्या बदलून त्यांची गुंतवणूक मर्यादा कुटीर उद्योगांसाठी १ कोटी, लघु उद्योगांसाठी ५ कोटी व मध्यम उद्योगांसाठी १० कोटी अशी करण्यात आल्याने अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार आहे़

 

Web Title:  Welcome to the schemes announced by the Central Government for industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.