आज १४ फेब्रुवारी जगभरात हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपले प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो, अनेकजण आपल्या जोडीदाराला भेटवस्तूंद्वारे, आपले प्रेम व्यक्त करत असतात. सध्या एका भेटवस्तुची जोरदार चर्चा सुरू आहे. ही भेटवस्तु सर्वात महागडी आहे. या भेटवस्तूची किंमत सुमारे 240 कोटी रुपये आहे.
मुंबईतील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीला ही भेट दिली आहे. या भेटवस्तूची किंमत देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या घरापेक्षा जास्त आहे.
वेलस्पन ग्रुपचे बीके गोएंका यांनी मुंबईत 240 कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत उद्योगपती रतन टाटा यांच्या घरापेक्षा जास्त आहे, कारण त्यांच्या घराची किंमत 150 कोटी रुपये आहे. पेंटहाऊस मुंबईतील वरळी येथे आहे. हे वरळीतील थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीच्या 63व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर असलेले ट्रिपल डेकर पेंटहाऊस आहे.
पेंटहाऊसचे एकूण क्षेत्रफळ 30000 चौरस फूट आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 2015 मध्ये जिंदाल कुटुंबाने 160 कोटी रुपयांचे घर घेतले होते. या घराचा आकार 10000 चौरस फूट होता.
बीके गोएंका हे वेलस्पन ग्रुपचे मालक आहेत, त्यांची कंपनी कापड, पोलाद, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, गोदाम आणि तेल आणि वायू क्षेत्रात काम करते. मूळचे हिसार, हरियाणाचे असलेले बीके गोएंका यांनी 1985 मध्ये आपली कंपनी सुरू केली. आता कंपनीचा 50 देशांमध्ये व्यवसाय आहे. फोर्बच्या अहवालानुसार, बीके गोएंका यांची एकूण संपत्ती 1.3 अब्ज डॉलर म्हणजेच 1 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे.
बीके गोएंका हे हरियाणातील हिस्सारचे आहेत. त्यांची पत्नी दीपाली गोएंका या वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.