कोरोना महासाथीच्या संकटकाळातही पश्चिम रेल्वेनं आपली आत्यावश्यक सामान पोहोचवण्याची सेवा योग्यरित्या सुरू ठेवली होती. चालू आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेनं १५० कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल कमावला आहे. पश्चिम रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकानुसारआता पर्यंत पार्सल बुकिंगद्वारे रेल्वेनं १ एप्रिल २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत १५०.७३ कोची रूपयांचा महलूल मिळवला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेद्वारे २२ मार्च २०२० ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मालगाड्यांच्या ३१,३१६ रॅक्सचं लोडिंग करण्यात आलं. याव्यतिरिक्त, मिलेनियम पार्सल व्हॅन आणि दुधाची टँक, मिल्क पावडर, औषधे, वैद्यकीय किट, फ्रोजन फूड यासारखे अत्यावश्यक घटक उत्तर आणि ईशान्येकडील राज्यात पाठवले गेले. पश्चिम रेल्वेच्या विविध इंटरचेंज पॉईंट्सवर एकूण, ६४,०१९ फ्रेट गाड्या अन्य विभागीय रेल्वेबरोबर इंटरचेंज करण्यात आल्या. त्यापैकी ३२,३०९ गाड्या हँड ओव्हर करण्यात आल्या, तसंच ३२,३१० गाड्यांचा टेक ओव्हर करण्यात आल्या. या गाड्यांमधून मिळणारा महसूल ६,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यामुळे पश्चिम रेल्वेला तब्बल ३९२८ कोटी रूपयांचं नुकसान झालं. यामध्ये ६४६ कोटी रूपयांचं उपनगरीय सेक्शनमध्ये आणि अन्य प्रवासी ट्रेन बंद असल्यानं ३,२९८ कोटी रूपयांचं नुकसान झालं. असं असलं तरी १ मार्च २०२० ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रेल्वेनं ६२६ कोटी रूपयांची रक्कम प्रवाशांना परत केली आहे. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर ९९ लाख प्रवाशांनी आपली तिकिटं रद्द केली.
पार्सल बुकिंगद्वारे पश्चिम रेल्वेनं कमावला १५० कोटी रूपयांचा महसूल
Western Railway : कोरोना महासाथीच्या काळातही रेल्वेनं आपली ही सेवा ठेवली होती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 11:48 AM2021-02-17T11:48:48+5:302021-02-17T11:51:36+5:30
Western Railway : कोरोना महासाथीच्या काळातही रेल्वेनं आपली ही सेवा ठेवली होती सुरू
Highlightsकोरोना महासाथीच्या काळातही रेल्वेनं आपली ही सेवा ठेवली होती सुरूपश्चिम रेल्वेनं तिकिटांच्या परताव्याची रक्कम म्हणून प्रवाशांना परत केलं ६२६ कोटी रूपये