इतिहास किंवा भूतकाळातील आठवणी माणसाच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद आणत असतात. मग ते शाळेतील मित्रांसमवेतच्या आठवणी असोत किंवा कॉलेजमधील मजामस्ती असो. गाडीत २० रुपयांचं पेट्रोल भरुन मारलेला फेरफटका असो किंवा बसच्या तिकीटात गाठलेलं मामाचं गाव असो. जुन्या काळातील आठवणी आजही भावनिक बंध निर्माण करतात. तेव्हा पैशांची कमतरता असताना एखादा सुखाचा प्रवास नक्कीच यादगार राहिलेला असतो. त्यामुळे, त्याच्या आठवणीही आपण जपून ठेवतो. याच आठवणीतील एक १९७५ सालचं विमान तिकीट व्हायरल झालं आहे.
एकेकाळी केवळ ८५ रुपयांत विमानाने प्रवास करता येत होता. एअर इंडियाचे एक तिकीट ट्विटरवर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये, मुंबई ते गोवा विमान प्रवास केवळ ८५ रुपयांत होत असल्याचं दिसून येतं. ४८ वर्षे जुन्या या तिकीटाचा फोटो @IWTKQuiz नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे, अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय. तर, नव्या पिढीला हे तिकीट आश्चर्य वाटणारं आहे.
हे तिकिट पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. तसेच, काहींना आपल्या पहिल्या विमान प्रवासाच्या, जहाँज प्रवासाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सन १९८२ मध्ये मुंबई ते अहमदाबादचं विमान तिकीट २०० रुपये एवढं होतं, असे एका युजरने सांगितलंय.
Indian Airlines ticket from 1975. Bombay to Goa for ₹85!
— India Wants To Know: India's First Panel Quiz Show (@IWTKQuiz) April 13, 2023
cc. @airindiainpic.twitter.com/FwJaLYDAX6
दरम्यान, आजच्या तारखेला तुम्हाला मुंबई ते गोवा प्रवास करायचा असल्यास १७८२ ते ११,८९४ रुपयांपर्यंत तिकीट खरेदी करावे लागेल. या तिकीट दरांत सर्वच एअरलाईन्सचे तिकीट दर इकॉनॉमीपासून ते बिझनेस क्लासपर्यंतच देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात महगाईने उच्चांक गाठल्याची चर्चा होते, महगाई वाढल्याचे सांगतिले जाते. कधीकाळी इतिहासात डोकावून पाहिल्यास खरंच महागाई किती वाढलीय, याची जाणीव होते.