लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत सध्या अर्थशास्त्रातील प्रसिद्ध ‘स्नोबॉल इफेक्ट’चा सामना करीत असून, यंदा भारताची आर्थिक वृद्धी सर्वाधिक वेगवान असू शकते, असे प्रतिपादन ‘जागतिक आर्थिक मंच’चे (डब्ल्यूईएफ) अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांनी केले आहे. याप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि नोकऱ्या निर्माण होतील, असेही ब्रेंडे यांनी म्हटले आहे.
‘स्नोबॉल इफेक्ट’ म्हणजे
n एखाद्या घटनेतून अनेक घटना घडणे. जेव्हा स्नोबॉल घरंगळतो, तेव्हा तो मोठा मोठा होत जातो.
n भारतीय अर्थव्यवस्थेबाबतही हेच होणार आहे. वृद्धीमुळे अधिक गुंतवणूक येईल. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.
n यातून भारतीय अर्थव्यवस्था तेजीत येईल, असा या अंदाजाचा अर्थ आहे.