Join us  

निवृत्तीनंतर काय?

By admin | Published: July 19, 2016 5:47 AM

म्हातारपणाची काठी म्हणून किंवा आर्थिक गरज म्हणून प्रत्येक जण बचत करत असतो

म्हातारपणाची काठी म्हणून किंवा आर्थिक गरज म्हणून प्रत्येक जण बचत करत असतो. काळानुरुप यात बदल होत गेले. वाढती महागाई, वाढत्या गरजा आणि एकूणच आर्थिक अस्थिरतेच्या काळात ४७ टक्के नागरिक भविष्याची तरतूद म्हणून बचतच करत नसल्याची धक्कादायक माहिती सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. >भाकरीचा चंद्र शोधण्यात...असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आधी भाकरीचा चंद्र महत्वाचा आहे, म्हणजेच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. देशाच्या अनेक भागातील हे कटू वास्तव आहे. ज्या ग्रामीण व दुर्गम भागात आजही अन्न, वस्त्र आणि निवारा याच मूलभूत गोष्टींभोवती संघर्ष सुरु आहे तिथे बचतीचा सल्ला म्हणजे अतिशयोक्तीच ठरू शकेल. >बचत सुरु केली, पण... नागरिकांनी बचत सुरु केली पण, यातील बहुतांश भारतीयांनी आता बचत करणे थांबविले आहे. तसेच बचत करणारे अनेक जण आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत आहेत. म्हणजेच सद्याच्या महागाईत मूळ गरजा भागविणे कठीण झाले असून बचत हा त्यानंतरचाभाग आहे. नव्याने नोकरीत असलेल्या अनेक जणांनी अशी बचत करायला अद्याप सुरुवातच केलेली नाही. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना बचत करणे शक्य होत नाही. जागतिक स्तरावर बचत न करणाऱ्यांची आकडेवारी ४६% आहे.