Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉन्ट्रा अन् डिव्हिडंड यिल्ड फंड म्हणजे काय? गेल्या काही वर्षात दिलाय भरघोस परतावा

कॉन्ट्रा अन् डिव्हिडंड यिल्ड फंड म्हणजे काय? गेल्या काही वर्षात दिलाय भरघोस परतावा

तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.

By पुष्कर कुलकर्णी | Published: January 3, 2024 02:57 PM2024-01-03T14:57:41+5:302024-01-03T14:58:51+5:30

तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.

What are Contra and Dividend Yield Funds It has given huge returns in the last few years mutual fund investment | कॉन्ट्रा अन् डिव्हिडंड यिल्ड फंड म्हणजे काय? गेल्या काही वर्षात दिलाय भरघोस परतावा

कॉन्ट्रा अन् डिव्हिडंड यिल्ड फंड म्हणजे काय? गेल्या काही वर्षात दिलाय भरघोस परतावा

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

कॉन्ट्रा फंड: 
शेअर बाजार तेजीत असताना असे उत्तम कंपन्यांचे शेअर्स निवडणे जे सध्या तेजीत नसून कमी भावात उपलब्ध आहेत आणि भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता राखतात. असे शेअर्स ज्या प्रकारात गुंतविले जातात असा म्युच्युअल फंड्सला कॉन्ट्रा फंड म्हणतात. फंड व्यवस्थापक अशा शेअर्सची निवड अभ्यासपूर्ण करीत असतात. जेव्हा संधी मिळते तेव्हा खरेदी करतात आणि अपेक्षित भाववाढ मिळाल्यावर विक्री करतात. अशा फंड्स मध्ये रिस्क ही असते. कारण निवड चुकली तर अपेक्षित रिटर्न्स मिळत नाहीत. यामुळे म्युच्युअल फंड्स संस्था एकतर व्हॅल्यू फंड किंवा कॉन्ट्रा फंड यापैकी एकाच ऑफर करू शकते.

कॉन्ट्रा म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स

मागील १ वर्ष  - १६ ते २५ टक्के
मागील ३ वर्षं -  १९ ते ३४ टक्के
मागील ५  वर्षं -  १६ ते २२ टक्के
मागील १० वर्षे -  १६ ते १९ टक्के
(परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात)

हेही वाचाः भाग १
Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा

हेही वाचाः भाग २ 
म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्या

हेही वाचाः भाग ३ 
म्युच्युअल फंडचा राजा 'इक्विटी फंड'; यात कसे मिळतात जास्तीत जास्त 'रिटर्न्स'?

डिव्हिडंड यिल्ड फंड:
शेअर बाजारात अनेक कंपन्या उत्तम डिव्हिडंड देतात. कंपनीला मिळालेला नफा शेअर धारकांस वाटणे याला डिव्हिडंड देणे असे म्हणतात. डिव्हिडंडचे प्रमाण किती असावे याबाबत कंपनी बोर्ड निर्णय घेत असते. डिव्हिडंड यिल्ड फंडमध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्यांची निवड करतो ज्या उत्तम डिव्हिडंड देत असतात. यात मागील काही वर्षे दिलेला डिव्हिडंड आणि त्यातील सातत्य हा महत्त्वाचा रिसर्च केला जातो. उत्तम डिव्हिडंड देऊन शेअरमध्ये भाववाढ होत असेल तर गुंतवणूकदार अधिक फायद्यात राहत असतात. परतावा मिळण्यात सातत्य असावे या अपेक्षेने या फंडमध्ये गुंतवणूक केली जाते.

डिव्हिडंड म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स
मागील १ वर्ष  - १८ ते २७ टक्के
मागील ३ वर्षं -  १८ ते ३० टक्के
मागील ५  वर्षं -  १५ ते १८ टक्के
मागील १० वर्षे -  १४ ते १६ टक्के
स्रोत : ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन संकेतस्थळ

हेही वाचाः भाग ४
आधे इधर, आधे उधर... बड्या कंपन्यांचे शेअर पडले, तरी गुंतवणूक 'सेफ' ठेवणारा फंडा!

हेही वाचाः भाग ५
Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'

हेही वाचाः भाग ६

ईएलएसएस फंड म्हणजे काय? गुंतवणूक करा, उत्तम रिटर्न्स मिळवा अन् टॅक्सही वाचवा!


गुंतवणूकदारांनी कृपया नोंद घ्यावी की म्युचअल फंडमधील परतावा विविध म्युच्युअल फंड संस्थांचा असून यात वेळोवेळी बदल होत राहतात.

कोरोना पश्चात शेअर बाजार एकतर्फा वाढला यामुळे तीन वर्षांतील रिटर्न्स सर्वोत्तम दिसत आहेत. विविध कॅप मधील फंड्स मध्येही असे आवर्जून निदर्शनास येते.

पुढील भागात जाणून घेऊ फोकस आणि सेक्टर फंड विषयी...

Web Title: What are Contra and Dividend Yield Funds It has given huge returns in the last few years mutual fund investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.