आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकदा गृहकर्ज घेण्याची गरज भासू शकते. यासाठी तुम्हाला काही चार्जेसही भरावे लागतात. आजच्या युगात अनेक बँका गृहकर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, पण त्या आकारत असलेलं शुल्क मात्र वेगळवेगळं आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. याद्वारे तुम्ही सहजपणे ठरवू शकाल की कोणत्या बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आपण आता या शुल्कांबद्दल माहिती घेऊ.अॅप्लिकेशन फीहे शुल्क तुमच्या गृहकर्ज अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी आकारलं जातं. या फीचा तुम्हाला कर्ज मिळेल की नाही याच्याशी काहीही संबंध नाही आणि ती परत केली जात नाही. तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे अर्ज सबमिट केल्यास आणि नंतर तुमचा विचार बदलल्यास, तुमची अर्जाची फी वाया जाईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचं आहे याची खात्री करा.
माफ करुन घेऊ शकताहे शुल्क लोन अॅप्लिकेशनसह आधीच घेतलं जातं. प्रोसेसिंग फी ही परत केली जात नाही. परंतु काही बँका या फी चा एक भाग लोन अॅप्लिकेशनसह घेतात आणि उर्वरित लोन घेतल्यानंतर देण्याची सुविधा काही बँका देतात. काही वेळा ही एक फ्लॅट फी किंवा लोनच्या पर्सेंटेजच्या रुपात असू शकते. बँका किंवा वित्तीय संस्था याचा निर्णय घेतात. काही वेळा बँका हे शुल्क माफही करू शकतात. मॉर्गेज डीड फीहोम लोन घेताना तुम्हाला एक मोठं शुल्क द्यावं लागतं. हे सामान्यत: पर्सेटेंजच्या रुपात असतं. लोनसाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा हा मोठा भाग असतो. काही वित्तीय संस्था होम लोन प्रोडक्ट अधिक आकर्षक बनवण्यासाठी हे शुल्क माफही करतात.लीगल फीवित्तीय संस्था साधारणपणे प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती तपासण्यासाठी बाहेरच्या वकिलांची नियुक्ती करतात. यासाठी वकील जे फी आकारतात, ते वित्तीय संस्था ग्राहकांकडून घेतात. परंतु जर वित्तीय संस्थेनं जर प्रॉपर्टीला यापूर्वीच मंजुरी दिली असेल तर हे शुल्क लागू केलं जात नाही. ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय त्याला पहिल्यापासून मंजुरी मिळाली आहे का नाही हे तपासून पाहा. याप्रकारे तुम्ही लीगल फी वाचवू शकता.प्रीपेमेंट पेनल्टीप्रीपेमेंटचा अर्थ लोनधारकानं कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपलं लोन फेडणं. यामध्ये बँकांना काही वेळा नुकसान होतं, त्यामुळे काही वेळा त्यावर प्रीपेमेंट चार्जेस आकारले जातात. निरनिराळ्या वित्तीय संस्थांप्रमाणे हे शुल्क निराळे असू शकते. परंतु रिझर्व्ह बँकेनं फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या होमलोनवर प्रीपेमेंट पेनल्टी न घेण्याचे आदेश दिलेत. फिक्स्ड रेट होम लोनसाठी फ्लॅट रेटवर प्रीपेमेंट पेनल्टी घेतली जाते, जी २ टक्क्यांपर्यंत असू शकते. जर तुम्हाला लोन कालावधीपूर्वीच फेडायचं असेल तर तुम्हाला या शुल्काची काळजी घ्यावी लागेल.कमिटमेंट फीकाही संस्था लोन प्रोसेसिंग आणि मंजुरी दिल्यानंतर एका ठराविक कालावधीत लोन न घेण्याच्या स्थितीत कमिटमेंट फी आकारतात. ही अशा प्रकारची एक फी आहे, जी वितरित न केलेल्या लोनवर आकारली जाते.