Join us  

IPO संबंधी आयकरात काय तरतुदी आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 8:43 AM

IPO: टाटा टेक्नॉलॉजीचा IPO सध्या शेअर मार्केटमध्ये चर्चेचा मुख्य विषय झाला आहे. त्याविषयी बरेच बोलले जात आहे. करदात्यांसाठी IPO विषयी थोडक्यात माहिती द्या

- उमेश शर्मा(चार्टर्ड अकाउंटंट)अर्जुन : कृष्णा, टाटा टेक्नॉलॉजीचा IPO सध्या शेअर मार्केटमध्ये चर्चेचा मुख्य विषय झाला आहे. त्याविषयी बरेच बोलले जात आहे. करदात्यांसाठी IPO विषयी थोडक्यात माहिती द्या.कृष्णा : अर्जुन, IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याचाच अर्थ कंपनीचे शेअर मार्केटमध्ये पहिले पाऊल. IPO द्वारे कंपनी सामान्यांकडून शेअर्सच्या बदल्यात भांडवल जमा करते. IPO नंतर कंपनी खऱ्या अर्थाने पब्लिक होते आणि कोणीही कंपनीच्या शेअर्सची विक्री किंवा खरेदी करू शकते. कंपनीचे IPO कमीत कमी ९० टक्के सबसक्राइब होणे आवश्यक असते. टाटा टेक्नॉलॉजीचा IPO ७० पट ओव्हर सबस्क्राइब झाला आहे.अर्जुन : कृष्णा, शेअर्सच्या विक्रीवर इनकम टॅक्समध्ये काय तरतुदी आहेत?कृष्णा : अर्जुन, IPO मध्ये जर करदात्याला शेअर्स मिळाले तर अशा शेअर्सवर होणाऱ्या लिस्टिंग गेनवर इनकम टॅक्स लागत नाही; परंतु जर हे शेअर्स करदात्याने विकले तर मात्र यावर कर लागू होतो. शेअर्सच्या विक्रीवर किती टक्के कर लागेल हे शेअर्स किती काळ होल्ड केले त्यावर अवलंबून असते. लिस्टेड शेअर्सची विक्री जर १२ महिन्यांच्या नंतर केली असेल तर त्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन लागेल आणि जर विक्री १२ महिन्यांच्या आत केली असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू होईल. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन १५ टक्क्यांनी लागू होत असतो आणि लाँग टर्म कॅपिटल गेन हा एक लाखाहून अधिक असणाऱ्या गेनवर १० टक्के लागू होतो. याचाच अर्थ लाँग टर्म कॅपिटल गेनवर एक लाखापर्यंत सूट आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा? कृष्णा : अर्जुन, कंपनी IPO द्वारे आपल्या आर्थिक लक्ष्यांकडे वाटचाल मजबूत व्हावी यासाठी शेअर्स जारी करते; परंतु या सर्वांमध्ये कंपनीच्या वरिष्ठांना हे लक्षात ठेवावे लागते की, आपल्या कंपनीचे व्हॅल्युएशन योग्य आहे. कारण जर IPO कमीत कमी ९० टक्के सब्स्क्राइब नाही झाला तर कंपनीला सर्व पैसे परत करावे लागतात. करदात्यानेदेखील सर्व माहिती काढूनच IPO द्वारे गुंतवणूक केली पाहिजे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक