Join us

आयटी रिटर्नसाठी काय आहेत नियम?; ई-फायलिंगबाबत सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 7:40 AM

एक्सेल युटिलिटीज, जावा युटिलिटीजद्वारे किंवा थेट ई-फायलिंग प्लॅटफॉर्मवर अर्ज भरता येतो. थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरूनही दाखल केले जाऊ शकतात.

नवी दिल्ली - आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै २०२४ ची मुदत दिली आहे. वेतनधारक व्यक्ती आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर आयटीआर-१ फॉर्म वापरून रिटर्न भरू शकते. या फॉर्मला ‘सहज’ म्हणूनही ओळखले जाते.

नोकरीतू वेतन, घराच्या मालमत्तेतून येणारी मिळकत, तसेच गुंतवणुकीतून मिळणारे व्याज आणि लाभांशातून येणारे उत्पन्न मिळणाऱ्या व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. 

किती आहे उत्पन्नाची मर्यादा?यासाठी उत्पन्नाची मर्यादा वर्षाला ५० लाख रुपये इतकी आहे. पगारातून मिळणारे वेतन, मालकीच्या घरातून मिळणारे उत्पन्न, कुटुंबाला मिळणारे निवृत्तीवेतन, शेतीमालातून पाच हजार रुपयांपर्यंतची मिळकत, तसेच अन्य मार्गांनी येणारे उत्पन्न अससेले हा अर्ज दाखल करू शकतात.बँकेतील ठेवी, पोस्ट खात्यात बचत, तसेच सहकारी बँकांमधील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न असलेले आयटीआर-१ चा फॉर्म भरू शकतात.

भरण्याचा सोपा मार्ग कोणता?एक्सेल युटिलिटीज, जावा युटिलिटीजद्वारे किंवा थेट ई-फायलिंग प्लॅटफॉर्मवर अर्ज भरता येतो. थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरूनही दाखल केले जाऊ शकतात. रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची शिफारस केली जाते, त्यात कुणीच्या हस्तक्षेपाची शक्यता नसते. करदात्याची मेहनत व वेळेची बचत होते. यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर पॅन/आधार आणि पासवर्डसह लॉग इन करावे.

आयटीआर-१ भरण्यास कोण अपात्र? 

भारताचे सामान्य नागरिक नसलेले, अनिवासी भारतीय व्यक्ती. लॉटरी व्यवसाय, घोड्यांच्या शर्यती, कायदेशीर जुगार यातून कमाई करणारे.लघु किंवा दीर्घ मुदतीत भांडवली नफ्यातून कमाई करणारे. एकापेक्षा अधिक घरांचे मालक असलेले.कंपनीत संचालक असलेले, व्यापारातून कमाई करणारे. नोंदणीकृत नससेल्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे. कलम १९४ एन नुसार बँकेतून काढलेल्या रोखीवर कर भरणारे. एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स प्लान्सवर आयकर थकित असणाऱ्या व्यक्ती. परदेशी शेअर्स असलेले किंवा विदेशी शेअर्समधून लाभांश घेणारे. 

टॅग्स :इन्कम टॅक्स