Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार...

काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार...

बँक ऑफ बडोदाने याबाबतचा रिपोर्ट जारी केला आहे. या काळात पेट्रोल दिल्लीत 96.70 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटरवर स्थिर होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:12 AM2023-03-24T10:12:36+5:302023-03-24T10:14:12+5:30

बँक ऑफ बडोदाने याबाबतचा रिपोर्ट जारी केला आहे. या काळात पेट्रोल दिल्लीत 96.70 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटरवर स्थिर होते.

What! Base price of petrol, diesel reduced by Rs 20; When will Modi government reduce fuel Prices in Country | काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार...

काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार...

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरांत किंचितही कपात केलेली नाहीय. जून २०२२ पासून ते यंदाच्या मार्चपर्यंत म्हणजेच १० महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतींत 58.80 रुपयांवरून ३८.७० रुपये प्रति लीटर एवढी कपात झाली आहे. परंतू, तेव्हापासून आजपर्यंत एक रुपयाही कमी झालेला नाही. 

पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...

बँक ऑफ बडोदाने याबाबतचा रिपोर्ट जारी केला आहे. या काळात पेट्रोल दिल्लीत 96.70 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटरवर स्थिर होते. जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती १५ महिन्यांतील निच्चांकी म्हणजेच ७१ डॉलर प्रति बॅरल एवढे खाली उतरले आहे. 

पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवूनही तिन्ही तेल कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात 21,201 कोटींचा तोटा झालेला होता. त्याची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने या कंपन्यांना २२ हजार कोटी दिले होते. 

एप्रिल 2020 मध्ये तीन वर्षांपूर्वी पेट्रोलची मूळ किंमत 28 रुपये प्रति लीटर होती. डिझेलची किंमत 31.5 रुपये प्रति लीटर होती. मात्र, ही किंमत गेल्या काही काळात ५७ रुपयांवर गेली होती. दोन्हींच्या मूळ किंमतीत मोठी वाढ झाली होती. आता ही किंमत ३८.७० रुपयांवर आली आहे. 

दिल्लीतील किंमत आणि कर...
पेट्रोल डिझेलची किंमत अशा प्रकारे समजून घ्या

मूळ दर57.20 (पेट्रोल)57.90 (डिझेल)
उत्पादन शुल्क19.9015.80
राज्य कर15.7013.10
डीलर कमिशन3.802.60
वर्तमान किंमत96.7089.96

 

Web Title: What! Base price of petrol, diesel reduced by Rs 20; When will Modi government reduce fuel Prices in Country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.