Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॅपिटल रेझिंग म्हणजे ?

कॅपिटल रेझिंग म्हणजे ?

या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:34 AM2019-01-07T03:34:06+5:302019-01-07T03:34:30+5:30

या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही.

What is Capital Rising? | कॅपिटल रेझिंग म्हणजे ?

कॅपिटल रेझिंग म्हणजे ?

विशाल कुलकर्णी

अर्थसंज्ञाच्या २०१८ च्या सदरात आपण पाहिले की, गुंतवणुकीचा विचार करत असताना सामान्यपणे कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच कोणकोणत्या संज्ञा माहीत असणे आवश्यक आहे आणि का आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेक वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रि या वाचून हे कळले की, हे सदर आपल्या ज्ञानाची तहान शमवण्यासाठी काही प्रमाणात उपयोगात आले. मग, आता नवीन काय... असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही. यात आपल्याला आर्थिक विश्वातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींशी ओळख करून घेता येईल. आपण जेव्हा आर्थिक विश्वात भ्रमण करण्याचे मनात आणतो, तेव्हा या विश्वाची सफर करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असते. ‘अर्थविश्व-२०१९’ या सदरातून वाचकांना अशा काही आर्थिक विश्वातील महत्त्वाच्या बाबी वाचण्यास मिळतील.
जेव्हा आपण आर्थिक व्यवस्थापनाचा विचार मनात आणतो, तेव्हा या आर्थिक विश्वातील गोष्टींशी मैत्री असणे कधीही चांगले नाही का... कोणत्याही कंपनीला व्यवसाय उभारणी करण्यास एका महत्त्वाच्या गोष्टीची फार आवश्यकता असते, ती म्हणजे भांडवल. एका ठरावीक रकमेतून एखादी व्यक्ती भांडवल उभारणी करते किंवा तसे करण्याचा प्रयत्न करते. आता व्यवसाय म्हटले की, एखादी सेवा किंवा उत्पादन करणे आले. त्यासाठी किंवा त्याचे निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री आली. आणखी इतर गोष्टी ओघाओघाने आल्याच. त्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. हा पैसा उभारणे म्हणजे कॅपिटल रेझिंग करणे होय. जेव्हा एखादी कंपनी बाजारात एखाद्या व्यवसायात येते, तेव्हा ती आयपीओमार्फत सामान्य जनतेतून भांडवल उभारणीचा प्रयत्न करते. त्यातून जो पैसा उभा राहतो, त्यातून व्यवसायाची पुढील वाटचाल सुरू होते. जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचे कॅपिटल अमुकअमुक आहे, असे वाचतो तेव्हा आपल्याला हे कॅपिटल म्हणजे भांडवल होय, हे कळणे गरजेचे आहे. ज्या वस्तूंचे, सेवेचे उत्पादन करायचे आहे, त्यासाठी या भांडवलाचा विनियोग केला जातो. तसेच व्यवसाय सतत चालू राहण्यासाठीदेखील भांडवलाची गरज असते, म्हणजेच असे भांडवल खेळते राहणे गरजेचे असते. भांडवल हा कोणत्याही व्यवसायाचा प्राणवायू असतो. त्याचा व्यवसायात सतत पुरवठा होत राहणे गरजेचे असते. 

अर्थविश्व म्हटलं की सर्वसामान्य माणूस काहीसा गोंधळतो. त्यातील चढउतार, गुंतवणूक, परिणाम झटकन लक्षात येत नाही. मागील वर्षभरात अर्थसंज्ञा या सदरातून आपण गुंतवणूक करताना सामान्यपणे कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते पाहिले. यंदा आर्थिकविश्व या सदरातून आपण महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. कंपनी छोटी असो किंवा मोठी. तिला कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी गरज असते ती भांडवलाची. प्रत्येक टप्प्यावर लागणारी गोष्ट म्हणजे पैसा आणि हा पैसा उभा करणे म्हणजेच कॅपिटल रेझिंग होय.
 

Web Title: What is Capital Rising?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.