Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगदीप सिंग यांनी ४८ कोटी रुपये प्रतिदिन पगारासाठी काय केले? सांगितल्या ५ गोष्टी

जगदीप सिंग यांनी ४८ कोटी रुपये प्रतिदिन पगारासाठी काय केले? सांगितल्या ५ गोष्टी

मी माझ्या तीन दशकांच्या अनुभवावरून पाच बाबी सांगतो. ज्या तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:39 IST2025-03-16T13:32:26+5:302025-03-16T13:39:53+5:30

मी माझ्या तीन दशकांच्या अनुभवावरून पाच बाबी सांगतो. ज्या तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. 

What did Jagdeep Singh do for a salary of Rs 48 crore per day he told 5 things | जगदीप सिंग यांनी ४८ कोटी रुपये प्रतिदिन पगारासाठी काय केले? सांगितल्या ५ गोष्टी

जगदीप सिंग यांनी ४८ कोटी रुपये प्रतिदिन पगारासाठी काय केले? सांगितल्या ५ गोष्टी

विद्यार्थीदशेत म्हणजे एमबीए पूर्ण करत असताना मी एक गरीब पदवीधर विद्यार्थी होतो. शैक्षणिक कर्जावर जगत होतो. पैसे वाचावे, जास्तीचे कर्ज होऊ नये यासाठी आठवडाभर एकच स्नॅक्स आणि एक ब्रेडचे पाकीट पुरवायचो. एका भाड्याने घेतलेल्या खोलीत राहायचो. थोडक्यात आपण अशा एका महान देशात राहतो की कोणी अगदी गरीब परिस्थितीतून सुरुवात केली तरी मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने साकार करू शकतो. माझे स्वप्न हे अभियांत्रिकी पदवीच्या सुरुवातीपासून, एक कंपनी सुरू करण्याचे होते. 

मी माझ्या तीन दशकांच्या अनुभवावरून पाच बाबी सांगतो. ज्या तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. 

मोठी समस्या निवडा 
काहीतरी मोठा प्रोजेक्ट किंवा समस्येवर काम करा, त्याशिवाय मोठा बदल घडवू शकत नाही. मोठी समस्या निवडल्याने तुम्ही ती सोडवू शकालच असे नाही. या प्रयत्नात अपयशी झालात तरी लहानशा गोष्टीत यशस्वी होण्यापेक्षा ही बाब कधीही अधिक रोमांचक असेल.

अशा कल्पना निवडा की...  
जगातील अनेक क्रांतिकारी बदल अशा लोकांनी घडविले आहेत, जे सुरुवातीला अशक्य वाटणाऱ्या कल्पनांवर काम करत होते. काहींना त्या कल्पना फक्त अव्यवहार्य वाटत होत्या, तर अनेकांना त्या हास्यास्पदही वाटल्या होत्या. त्यामुळे दृष्टिकोन आणि दिशा योग्य ठेवा.

सखोल अभ्यास हवा 
आपण निवडलेल्या संकल्पनेवर आधी कोणी काम केले?, ते का अपयशी ठरले?, कोणत्या चुका टाळता येऊ शकतात? 
या क्षेत्रातील सर्वोत्तम लोक कोण आहेत? तुमच्याकडे कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? आदी प्रश्नांसाठी सखोल अभ्यास करून उत्तरे शोधा. 

जागतिक टीम उभारा
मोठ्या संकल्पनांवर काम करण्यासाठी तुम्ही एकटे पुरे पडू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात उच्चतम प्रतिभा असलेली टीम हवी, जी तुमच्याकडे नसलेल्या कौशल्यांचा भांडार असेल. एकत्र येऊन कार्यक्षमतेने काम करू शकेल. जगातील सर्वोत्तम लोक तुमच्या सोबत असावे.

चुका स्वीकारा, पुढे जा
स्वप्नांचा पाठलाग करताना, तुम्ही धाडसाने प्रयत्न करता, तेव्हा चुका होणारच. पण यशाची खरी गुरुकिल्ली हीच की, चुका स्वीकारा, त्यातून शिका आणि पुन्हा तीच चूक करू नका.

जगात सर्वाधिक पगार
जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांचे वर्षाचे पॅकेज १७५०० कोटी म्हणजे एका दिवसाचे वेतन ४८ कोटी रुपये. इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मितीच्या कंपनीत काम केल्यानंतर ते आता एका कंपनीत सीईओ आहेत.
(संकलन : महेश घोराळे)

Web Title: What did Jagdeep Singh do for a salary of Rs 48 crore per day he told 5 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.