Join us  

प्राईम मेंबरशिप न घेतल्यास 31 मार्चनंतर जिओचं काय?

By admin | Published: March 29, 2017 4:15 PM

31 मार्चला रात्री 12 वाजता प्राईम मेंबरशिप आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’ (मोफत डेटा आणि कॉलिंग) सेवा बंद होणार आहे. त्यामुळे प्राईम मेंबरशिप ने घेतल्यास एक एप्रिल पासून जिओचं काय?

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - 1 एप्रिलपासून जिओची ‘हॅप्पी न्यू ईयर’ मोफत सेवा बंद होणार आहे. सहा महिन्यापूर्वी या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि डेटा प्लॅन देण्यात आला होता.  कंपनीकडून जिओ प्राईम मेंबरशिप घेण्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. पण जिओ प्राईम मेंबरशिप घेण्याची मुदत वाढवू शकते असं मत दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलं आहे. पण जिओ कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत  माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्राईम मेंबरशिप नं घेतल्यास 31 मार्चनंतर जिओचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला असणार आहे. प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. 
31 मार्चला रात्री 12 वाजता प्राईम मेंबरशिप आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’ (मोफत डेटा आणि कॉलिंग) सेवा बंद होणार आहे. त्यामुळे एक एप्रिल पासून प्राईम मेंबरशिप ने घेतल्यास जिओचं काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी जिओकडून प्रत्येक ग्राहकाला दररोज चार-पाच मेसेज केले जात आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या. मात्र जिओची फ्री डेटा सर्व्हिस 31 मार्चपासून बंद होणार आहे.
जर तुम्ही प्राईम मेंबरशिप घेतली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 28 जीबी डेटा आणि कॉससाठी 303 रुपये मोजावे लागतील. प्राईम मेंबरशीप नाही घेतल्यास 1 एप्रिलपासून तुम्हाला रिचार्ज करावा लागेल. माय जिओ अॅपवर तुम्हाला प्रिपेडचे विविध प्लॅन दाखवले जातील. त्याप्रमाणे तुम्हाला एक प्लॅन निवडून रिचार्ज करावा लागेल.  जियो स्टोर वरुनही तुम्ही रिचार्ज करु शकता. जर तुम्ही पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्हाला कोणताही एक प्लॅन घ्यावा लागेल. माय जिओ अॅपवर तूम्ही लॉगइन केल्यास तुम्हाला माय प्लॅनवर जा. तिथे तुम्हाला हॅप्पी न्यू ईयर दिसेल. तिथेच वरती तुम्ही प्रिपेड ग्राहक आहात की पोस्टपेड हे दिसेल. 
 
जिओ बंद करायचे असल्यास -
प्रिपेड ग्राहकांसाठी -
तुम्हाला जर जिओ सिम बंद करायचे असल्यास सिम कार्डमध्ये झिरो बॅलन्स ठेवून ते 90 दिवसापर्यंत वापरु नका. असे केल्यास तुमचे सिम आपोआप बंद होईल. 
पोस्टपेड ग्राहकांसाठी - 
जर तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल आणि तुम्हाला तुमचे सिमकार्ड बंद करायचे असेल तर तुम्हाला जियो स्टोर मध्ये जावे लागेल. 
 
प्राईम मेंबरशिप न घेतल्यास  काय आहेत प्लॅन
-149 रुपये : 2 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, रोमिंग फ्री,  वैधता 28 दिवस
- 303 रुपये : 'हॅप्पी न्यू इअर' प्लॅनमधील सर्व सुविधा, प्रती दिन 1 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 28 दिवस
- 499 रुपये : प्रती दिन 2 जीबी 4G डाटा म्हणजेच एकूण 56 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 28 दिवस
- 999 रुपये : 60 जीबी 4G डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 60 दिवस 
- 1999 रुपये : 125 जीबी 4G डाटा,  डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 90 दिवस 
- 4999 रुपये : 350 जीबी 4G डाटा,  डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 180 दिवस
- 9999 रुपये : 750 जीबी 4G डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 360 दिवस