Join us

चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास घाबरू नका; त्वरित करा ही प्रक्रिया, होणार नाही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 5:20 PM

Money Transfer : अनावधानानं किंवा चुकीची माहिती टाकल्यानं चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते परत मिळण्याची शक्यता असते.

ठळक मुद्दे अनावधानानं किंवा चुकीची माहिती टाकल्यानं चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते परत मिळण्याची शक्यता असते.आपले पैसे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. 

गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहार वेगाने वाढले आहेत आणि बँकिंग ते खरेदीपर्यंत सर्वकाही ऑनलाइन होत आहेत. एखाद्याच्या खात्यावर पैसे पाठविण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही, आपण ते घरी बसूनच करू शकतो. तथापि, काहीवेळा असे घडते की काही चुकीमुळे किंवा अनावधानानं पैसे पाठवताना ते चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जातात. या परिस्थितीत आपल्याला पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी एक प्रक्रिया आहे. परंतु त्यासाठी हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की अन्य कोणाच्या खात्यात चुकीनं गेले पैसे तेव्हाच परत मिळतील जेव्हा त्या व्यक्तीच्या खात्तात पैसे गेलेली ती व्यक्ती त्यासाठी तयार असेल. बँक या प्रकरणी एक माध्यम म्हणून काम करेल.ही समस्या मुख्यतः खाते क्रमांक, आयएफसी कोड किंवा दोन्हीमध्ये टाइपिंग त्रुटीमुळे होते. अशा खात्यावर पैसे गेले जे एक्झिट करत नाही तर त्यांच्या खात्यात ते पैसे पुन्हा येतात. परंतु एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेल्यात त्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जर तुमची बँक आपल्या तक्रारीवर काही काम करत नसेल तर तुम्हाला लोकपालाकडे जावं लागेल. ते पुझील कार्यवाही करू शकतात. त्वरित बँकेशी संपर्क साधा

  • पैसे ट्रान्सफर केल्यानंतर चुकीच्या खात्यात गेल्यास बँकेला तुम्हाला ते पैसे चुकीच्या खात्यात गेल्याचं सिद्ध करावं लागेल. 
  • जर तुम्ही अशा व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले ज्याचं नाव तुम्ही पाठवत असलेल्या व्यक्तीच्या नावाशी मिळतं असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाण द्यावं लागेल.  
  • बँकेला याबाबत संपूर्ण माहती द्या आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्डही ठेवा.  
  • बँक या प्रक्रियेत एक फॅसिलिटेटर म्हणून काम करेल आणि ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेलेत त्याच्या ब्रान्चचं नाव, संपर्क क्रमांक तुम्हाला देऊ शकेल.  
  • ज्याला तुम्ही चुकून पैसे पाठवले आहेत तो त्याच बँकेचा ग्राहक असेल तर बँक तुमच्या वतीनं त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला पैसे परत पाठवण्यासाठी विनंती करेल.  
  • अशा परिस्थितीत ते सहमत झाल्यास कामकाजाच्या ७ दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. 
  • जर ती व्यक्ती अन्य ब्रान्चची असेल तर तुम्हाला त्या ब्रान्चमध्ये जाऊन बँक मॅनेजरशी संपर्क साधून तोडगा काढावा लागेल.  

जर पैसे देण्यास नकार दिला तर...

  • चुकून एखाद्याच्या खात्यात पैसे गेले, तरी त्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय पैसे परत  करता येणार नाही.  
  • अशा परिस्थितीत प्रक्रिया थोडी कठीण होते. तुमच्या बँकेला यासंदर्भात संपूर्ण माहिती द्या. तसंच बँकेनं मागितेली संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल.  
  • त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईचाही पर्याय उपलब्ध आहे. 

(सोर्स - Policybazaar.com) 

टॅग्स :गुंतवणूकपैसाबँकऑनलाइन