Join us

एकाहून अधिक PPF खाती उघडल्यास होऊ शकते अडचण, असा करा बचाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:26 AM

सरकारच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतात.

नवी दिल्ली- सरकारच्या अनेक योजना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतात. त्या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला सुरक्षेचीही हमी देतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनाही गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला जबरदस्त फायदा होतो. तसेच या योजनेत गुंतवणुकीच्या रकमेवरच्या करातही सूट दिली जाते. त्यामुळे या योजनेत गुंतवलेल्या पैशांची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला जबरदस्त फायदा मिळतो. तसेच या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 8 टक्के व्याजदरही मिळते. परंतु जर तुम्ही एकाहून अधिक पीपीएफ खाती उघडल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

  • एकच पीपीएफ अकाऊंट उघडण्याचा नियम- 15 वर्षांच्या मुदतीतलं हे खातं पोस्टात जाऊन उघडता येते. परंतु कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावे फक्त एकच पीपीएफ खातं उघडू  शकते. मग ते तुम्ही बँकेत उघडा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये. 
  • एकाहून जास्त पीपीएफ अकाऊंट उघडल्यास- पीपीएफच्या नियमानुसार एक व्यक्ती एकच खातं उघडू शकते. जर चुकून दोनदा खातं उघडलं गेल्यास दुसऱ्या खात्याला वैध समजलं जात नाही. जोपर्यंत दोन खात्यांना एकत्र केलं जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या पैशावर व्याज मिळत नाही. अल्पवयीन मुलाच्या नावे त्याचे आईवडील पीपीएफ खातं उघडू शकतात. परंतु तो मुलगा दोन खाती उघडू शकत नाही. 
  • अशी करा दोन्ही खाती एकत्र- दोन्ही खात्यांना एकत्र करण्यासाठी तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडे अर्ज द्यावा लागणार आहे. या अर्जात दोन्ही पीपीएफ खात्यासंदर्भात तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती पोस्टाच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. जर दोन्ही खाती एकत्र केल्यानंतर खात्यातील जमा रक्कम 1.5 लाखाच्या वर गेल्यास उर्वरित रक्कम व्याजाशिवाय गुंतवणूकदाराला परत केली जाते. 
टॅग्स :पीपीएफ