Lokmat Money > बिझनेस न्यूज > आकडे काय सांगतात? फेब्रुवारी,मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री वाढली; LPG ची घटली

आकडे काय सांगतात? फेब्रुवारी,मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री वाढली; LPG ची घटली

फेब्रुवारीमध्ये इंधन विक्रीने उच्चांक गाठला होता. परंतु मार्चच्या सुरुवातीला त्यात थोडीशी घट झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 05:03 PM2023-04-02T17:03:32+5:302023-04-02T17:03:51+5:30

फेब्रुवारीमध्ये इंधन विक्रीने उच्चांक गाठला होता. परंतु मार्चच्या सुरुवातीला त्यात थोडीशी घट झाली होती.

What do the numbers say? Sales of petrol-diesel increased in February, March; LPG reduced | आकडे काय सांगतात? फेब्रुवारी,मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री वाढली; LPG ची घटली

आकडे काय सांगतात? फेब्रुवारी,मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री वाढली; LPG ची घटली

देशात पेट्रोल, डिझेलची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मार्चचा सुरुवातीला यामध्ये थोडी घट झालेली असली तरी महिनाभर मोठी विक्री नोंदविली गेली आहे. शेतीची कामे सुरु झाल्याने इंधनाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. 

फेब्रुवारीमध्ये इंधन विक्रीने उच्चांक गाठला होता. परंतु मार्चच्या सुरुवातीला त्यात थोडीशी घट झाली होती. यानंतरही मार्चमध्ये मागणी वाढली होती. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत पेट्रोलची विक्री 5.1 टक्क्यांनी वाढून 2.65 दशलक्ष टन झाली आहे. तर महिन्याच्या आधारावर विक्रीत 3.4 टक्के वाढ झाली आहे. 

डिझेलची विक्रीही गेल्या वर्षीच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी वाढून ६.८१ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. ल्या वर्षी मार्चमध्ये 6.67 दशलक्ष टन डिझेलची विक्री झाली होती. महिन्याच्या आधारावर डिझेलची मागणी 4.5 टक्क्यांनी वाढली आहे. 

कोरोना काळात पेट्रोल डिझेलची विक्री थंडावली होती. त्यानंतर २०२१ मध्ये थोडी वाढ दिसून आली होती. त्याच्या तुलनेत ही वाढ खूप मोठी आहे. याचा उलट परिणाम एलपीजीच्या विक्रीवर दिसून आला आहे. एलपीजीची विक्री ३ टक्क्यांनी घसरली आहे. मोठ्या प्रमाणावर दर वाढल्याने याचा परिणाम दिसून आला आहे. मार्च २०२३ मध्ये 2.37 दशलक्ष टन विक्री झाली. 
 

Web Title: What do the numbers say? Sales of petrol-diesel increased in February, March; LPG reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.