Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्यांना फ्लॅट-मर्सिडीज भेट देणारे सावजी ढोलकिया यावर्षी दिवाळीत काय गिफ्ट देणार?

कर्मचाऱ्यांना फ्लॅट-मर्सिडीज भेट देणारे सावजी ढोलकिया यावर्षी दिवाळीत काय गिफ्ट देणार?

सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या आणि आलिशान भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:16 AM2023-10-21T11:16:56+5:302023-10-21T11:17:36+5:30

सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या आणि आलिशान भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

What gift will Savji Dholakia give to employees on Diwali this year | कर्मचाऱ्यांना फ्लॅट-मर्सिडीज भेट देणारे सावजी ढोलकिया यावर्षी दिवाळीत काय गिफ्ट देणार?

कर्मचाऱ्यांना फ्लॅट-मर्सिडीज भेट देणारे सावजी ढोलकिया यावर्षी दिवाळीत काय गिफ्ट देणार?

दरवर्षी दिवाळी आल्यानंतर एका उद्योदपतीची जोरदार चर्चा होत असते, ते नाव म्हणजे सावजी ढोलकिया. ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीत बोनसमध्ये कार, फ्लॅट अशा महागड्या वस्तु देत असते. आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देणारे ढोलकिया हे प्रसिद्ध हिरे व्यावसायिक आहेत. महागड्या भेटवस्तू देतात आणि त्यामुळेच ते नेहमी चर्चेत राहतात. कधी कार, कधी फ्लॅट, कधी महागडे दागिने तसंच करोडोंची एफडी अशा भेटवस्तू देणारे ढोलकिया यावेळी कर्मचाऱ्यांना काय देणार, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या आणि आलिशान भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दिवाळीत आपल्या कर्मचार्‍यांना मोठ्या भेटवस्तू देऊन चर्चेत असलेले ढोलकिया यांनी २०१४ साली आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून ४९१ कार आणि २०७ फ्लॅट्स दिले होते. २०१८ मध्ये त्यांनी मर्सिडीज बेंझ गिफ्ट केली होती. कंपनीत २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आलिशान कार भेट देण्यात आल्या. १०१६ मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत भेटवस्तू म्हणून ४०० फ्लॅटचे वाटप केले आणि १२६० गाड्या भेट देण्यात आल्या.या वर्षी ते कर्मचाऱ्यांना काय गिफ्ट देणार याची माहिती अजुनही समोर आलेली नाही. 

सावजी ढोलकिया कोण आहेत?

हरी कृष्ण एक्स्पोर्ट्सचे मालक सावजी ढोलकिया यांच्या कंपनीत ५००० हून अधिक कर्मचारी काम करतात. लहानपणी गरिबीत जगणाऱ्या ढोलकिया यांनी संघर्षातून यश संपादन केले. गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या सावजी ढोलकिया यांनी वयाच्या १३व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. १० वर्षे डायमंड कटिंगचे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. आज त्यांच्या कंपनीने देशात आणि जगात आपला ठसा उमटवला आहे. १९९१ मध्ये त्यांनी हरी कृष्ण एक्सपोर्ट्सचा पाया घातला आणि २०१४ पर्यंत त्यांच्या कंपनीची उलाढाल चार अब्ज रुपयांवर पोहोचली.

Web Title: What gift will Savji Dholakia give to employees on Diwali this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.